🕒 1 min read
पणजी : शक्तिशाली तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या सर्व राज्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले शनिवारी म्हणाले. मोदींनी गुजरातला सर्वाधिक १ हजार कोटीची आर्थिक मदत देताना इतर राज्यांसोबत भेदभाव केल्याचा आरोप होत असताना आठवले यांनी हे वक्तव्य केले आहे.
चक्रीवादळाचा मोठा फटका गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूला बसला. या राज्यांमध्ये जीवितहानीसोबत मोठ्या प्रमाणात साधन-संपत्तीचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर गोव्यातील वास्को शहरात पत्रकारांशी बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सर्व राज्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
चक्रीवादळाने ग्रस्त गुजरातचा दौरा केल्यानंतर मोदींनी आपल्या गृहराज्यासाठी १००० कोटींच्या पॅकेजची घोषणा केली, तर इतर राज्यांना आपल्याकडे झालेल्या नुकसानाचा आढावा घेत केंद्राकडे अहवाल सोपविण्यास सांगितले आहे, असे आठवले म्हणाले.
दरम्यान, तौत्के चक्रीवादळाचा गुजरातला जोरदार तडाखा बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी गुजरातसाठी तब्बल एक हजार कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. परंतु पंतप्रधान मोदींनी गुजरातला मदत केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
- आसाममध्ये भाजप सरकार आणणार गो संरक्षण कायदा
- ‘मोदी सरकारच्या कुशासनामुळे म्युकरमायकोसिसचे संकट’, राहुल गांधींची टीका
- ‘कोरोनाविरोधी लढा दुबळा करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न’, प्रकाश जावडेकरांची टीका
- गंभीर! दावा ३० कोटी लसीकरणाचा, प्रत्यक्षात मात्र ४ कोटी नागरिकांना मिळाली लस
- लसीकरणाची गती वाढवण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवालांचे मोदींना चार सल्ले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

