Share

पदोन्नतीतील आरक्षण नाकारणारा निर्णय रद्द करा-प्रा. जोगेंद्र कवाडे

Published On: 

नागपूर : पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा शासन निर्णय मागासवर्गीयांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे तो निर्णय रद्द करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रपरिषदेत केली.

सर्वोच्च न्यायालयानेही पदोन्नतीतील आरक्षणाला निर्बंध घातलेले नाहीत. उलट राज्य सरकार हे आरक्षण देऊ शकते, असे सांगितले आहे. मात्र, प्रशासनातील मागासवर्गीयविरोधी यंत्रणेने ७ मेचा काळा जीआर काढून पदोन्नतीतील आरक्षणात अडथळे निर्माण केले आहेत.

अनुसूचित जाती व जमाती, भटके विमुक्त जमातींचा शासकीय सेवेतील अनुशेष सुमारे अडीच लाखांचा आहे. याशिवाय ३३ टक्के आरक्षणाचा कोटा भरण्यात आलेला नाही. शासकीय सेवेतील मागास प्रवर्गातील किती अनुशेष बाकी आहे हे जाहीर करावे, अशी मागणी कवाडेंनी केली.

दरम्यान, पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बराच वाद झाला होता. यामुळेच आता पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. पदोन्नती होत नसल्याने असलेली नाराजी दूर करण्यासाठी कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त जागा तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचा निर्णय राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी घेतला होता.

२५ मे २००४ च्या सेवा ज्येष्ठतेच्या स्थितीनुसार रिक्त जागा भरण्यात येतील असं सरकारने म्हटलं होतं. पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय जो निर्णय घेईल त्यानुसार मागासवर्गीय प्रवर्गातील आरक्षणाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं राज्य सरकारने जीआरमध्ये म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!