मुंबई : झी मराठी मराठी मनोरंजन क्षेत्रात नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत असते. काही दिवसापुर्वीच झी मराठीवर ‘माझा होशील ना’ या नव्या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सई आणि आदित्यची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. काही दिवसापुर्वीच या दोघांचे लग्न पार पडले.
आता या मालिकेत रंजक वळण येणार आहे. २३ मे रोजी रविवारनिमीत्त या मालिकेचा विशेष २ तासाचा भाग प्रसारीत होणार आहे. लग्नानंतर सई आणि आदित्यच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडत आहे. आजच्या भागात सई आणि आदित्यने चित्रपटाला जाण्याचा प्लान केला आहे. या चित्रपटाच्या निमीत्ताने दोघांच्या प्रेमाचा नवा रंग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. लग्नानंतर एकमेकासाठी वेळ न देता आल्याने आजच्या भागात ते बराच वेळ एकत्र दिसतील.
सई आणि आदित्यची प्रेमकहाणी प्रेक्षकांचे प्रेम जिंकण्यात यशस्वी झाली आहे. तर लग्नानंतर सई आणि आदित्यसोबत मजेत राहु लागली आहे. ब्रम्हेंच्या घरात चार सासरे आणि एका अज्जेसासऱ्यासोबत सई आनंदाने राहत आहे. तसेच या घरात गुलप्रितच्या एन्ट्रीने मालिकेत अजुन रंजक वळणे येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- १ जून नंतर राज्यात लॉकडाऊन वाढणार ? आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती…
- मोठी बातमी! बांग्लादेश दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव
- अफरीदीची मुलगी अडकणार लग्नबंधनात ; जावई आणि मुलीच्या नात्याबद्दल केला खुलासा
- ‘पति पत्नी और वो’ ; धनश्रीने शेअर केलेला फोटो चर्चेत
- बीसीसीआयच्या वार्षिक करारातील महिला आणि पुरुष मानधनातील तफावत; स्मीती मंधानाने मांडले मत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

