🕒 1 min read
मुंबई : कोरोनाच्या दुसरी लाटेतील रुग्णसंख्या, अपुरी आरोग्य व्यवस्था, ढिसाळ नियोजन, अपुरी मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा तीन तासांचा कोकण दौरा अशा मुद्द्यांवरून महाविकास आघाडीवर भाजपने हल्लाबोल केला आहे. तर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं असून विरोधकांना ब्लॅक फंगस म्हणजेच काळी बुरशी असं संबोधत बोचरी टीका केली आहे.
ते पुण्यात कोविड सेंटरच्या ऑनलाईन उद्घाटनावेळी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, ‘कोरोना महामारीत मुंबईत चांगल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केलंय, मात्र विरोधक त्यावर टीका करतायत. शिवसैनिकांनी त्याकडे दुर्लक्ष करून कामाकडे लक्ष द्यावे, कारण विरोधक ब्लॅक फंगस आहेत.’
गेल्या दीड वर्षात महाराष्ट्राला लागलेली काळी बुरशी कोण हे तुम्हीच पहा संजय राऊत..!@BJP4Maharashtra @bjp4mumbai pic.twitter.com/Oj4FcINADv
— Prasad Lad (@PrasadLadInd) May 22, 2021
दरम्यान, संजय राऊत यांच्या या विधानानंतर भाजप नेत्यांनी देखील त्यांच्यावर पलटवार केला आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करून महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ‘संजय राऊत बोलताना भान ठेवा. मागच्या दिड वर्षापासुन महाविकास आघाडीच्या नावाने ब्लँक फंगस हा ह्या महाराष्ट्राला लागला आहे. 2 हजार 200 कोटीचां भ्रष्टांचार महापालिकेत झाला. मेलेल्या लोकांच्या टाळुवरच काम शिवसेनेने केलंय. कोरोनाच्या काळात हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार ह्या महाविकास आघाडीने झालाय,’ असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘त्या’ व्हिडिओनंतर बाबा रामदेव यांची अडचण वाढली, IMA कडून कारवाईसाठी आक्रमक पवित्रा
- ‘…तर १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो
- …म्हणून लोक लाजेपायी दौऱ्यावर गेले तरी धावतपळत जेवायला घरीच येतात का? भाजप नेत्याचं राऊतांना प्रत्युत्तर
- जयंत पाटील, थोरात यांच्यावर गुन्हे दाखल करा; शिवसेना खासदाराच्या मागणीने आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर
- विरोधक ब्लॅक फंगस आहेत, शिवसैनिकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

