Share

‘अजित पवारांनी ठाकरेंना सल्ला द्यावा; ८ दिवस कोकणात जाऊन आपल्या स्टाईलने पंचनामे करून घ्यावेत’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी काल कोकण दौऱ्यावर आले होते. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला तोक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते हे देखील कोकणामधील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून आढावा घेत आहेत.

कोकणाला मदत देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी केवळ तीन तासातच आपला दौरा आटोपता घेतल्यामुळे भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांवरही निशाणा साधला आहे.

‘उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. पण त्यांनी 8 दिवस तिथं जाऊन राहावं. तिकडे वातावरणही चांगलं आहे. हातात काठी घेतल्याशिवाय प्रशासन काम करत नाही,’ असा सल्ला पाटलांनी दिला आहे. पुढे त्यांनी ‘आता महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यानंतर अजित पवारांना विचारण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे,’ असा टोला अजित पवारांना लगावला.

यासोबतच, ‘अजित पवारांनी उद्धव ठाकरेंनाही सल्ला द्यावा. 3 तासात पाहणी होत नाही. अजित दादांनीही 8 दिवस कोकणात जावं आणि त्यांच्या स्टाईलने पंचनामे करून घ्यावेत,’ असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!