Share

औरंगाबादेत तरुण वर्गच सुपर स्प्रेडर, बाधितांमध्ये ‘एवढ्या’ तरुणांचा समावेश!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका वृद्धांना असल्याचे पहिल्या व दुसऱ्या लाटे दरम्यान सांगितले जात होते. आता संभाव्य तिसर्‍या लाटेत बालकांना धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पण आजपर्यंतची आकडेवारी पाहता तरुणांनाच कोरोनाचा अधिक संसर्ग झाला आहे. त्याची टक्केवारी ६०.८७ टक्के एवढी नोंदवली गेली आहे. कामानिमित्त घराबाहेर पडणारे तरुण शहरात कोरोना संसर्गाचे सुपर स्प्रेडर ठरत आहेत.

कोरोनाच्या पहिला लाटेत मार्च २०२० पासून शहरातील तरुण मोठ्या संख्येने बाधित आढळून आले. दुसऱ्या लाटेतही हेच चित्र पाहायला मिळाले. नोकरी-व्यवसाय, खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या तरुणांना कोरोनाची बाधा होत आहे. महापालिकेने गुरुवारी दिलेल्या अहवालानुसार शहरात आत्तापर्यंत ८४ हजार ९२१ कोरोना रुग्ण आढळून आले.

त्यातील ५१ हजार ६९८ रुग्ण अठरा ते पन्नास वर्षे वयोगटातील आहेत. तिसरी लाट बालकांसाठी धोक्याची मानली जात असली तरीही पहिल्या दोन लाटेत बालकांना संसर्ग कमी प्रमाणात झाला. ५ ते १८ वर्षे वयोगटातील बालकांचे प्रमाण ९.५ टक्के आणि ० ते ५ वयोगटातील बाधित बालकांचे प्रमाण ९.०५ टक्के एवढे आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने तरुणच घराघरात कोरोनाचा फैलाव करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

शासनाने हाती घेतलेली कोरोना लसीकरण मोहीम लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे सध्या गोंधळलेल्या अवस्थेत आहे. मात्र औरंगाबादेतच नव्हे तर संपूर्ण देशभरात संभाव्य तिसरी लाट रोखायची असेल किंवा तिचा प्रभाव कमी करण्यासाठी १८ ते ५० वयोगटातील तरुणांच्या लसीकरणावर भर द्यायला हवा, असे मत तज्ज्ञांनी व्यक्‍त केले. संभाव्य तिसर्‍या लाटेपर्यंत आपण जेवढ्या अधिक प्रमाणत तरुणांचे लसीकरण करू शकू, तेवढ्या अधिक प्रमाणत तिसर्‍या लाटेचा जोर कमी करता येईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!