Share

सोशल मीडियावरील ‘तो’ शब्द हटवा; मोदी सरकारचा फेसबूक, ट्विटरला आदेश

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली :भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू आहे. भारतात सापडलेल्या व्हेरिंयटचा प्रसार इतर जगभरात होऊ नये म्हणून अनेक देशांनी भारतातून प्रवासास बंदी घातली आहे. पण या व्हेरियंटला भारतीय व्हेरियंट म्हणण्यावरुन केंद्र सरकारने हरकत घेतली आहे. यासंदर्भात माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने फेसबूक, ट्विटरसारख्या सोशल मीडिया कंपन्यांना आदेश दिलाय की त्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मवरुन कोरोना व्हायरसच्या भारतीय व्हेरियंटसंदर्भातील बातम्यांना काढून टाकावे.

दि. ११ मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं होतं की, कोरोना व्हायरसचा सर्वांत आधी भारतात आढळलेला B.1.617 व्हेरियंट हा जागतिक चिंतेचा विषय बनू शकतो. सरकारच्या वतीने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना एक पत्र लिहलं आहे, ज्यात सांगण्यात आलेय की, अनेक बातम्या, लेखांमध्ये B.1.617 ला कोणत्याही आधारशिवाय तसेच तथ्याशिवाय भारतीय व्हेरियंट म्हणून सादर केलं गेलं आहे.

पत्रात म्हटलंय की, कोरोनाच्या कोणत्याही व्हेरियंटला कोणत्याही आधाराशिवाय भारतीय व्हेरियंट म्हणणं देशाची प्रतिमा खराब करणारं आहे. अशा रिपोर्ट्समुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो आहे. तर एका सोशल मीडिया कंपनीशी संबंधित अधिकाऱ्याने म्हटलं की, प्लॅटफॉर्मवरुन हजारो-लाखोंचा कंटेट एकावेळेस हटवणं खूपच अवघड काम आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!