🕒 1 min read
पुणे : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाला विलंब होऊन, कोरोना संसर्गाचा धोका अधिकबळावत असल्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजनावर काँग्रेसने याआधीच टीकास्त्र सोडलं आहे, देशातील नागरिकांना प्राधान्य न देता इतर देशांमध्ये लस निर्यात केल्यानेच नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावं लागत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
दरम्यान, आता सीरमच्या बड्या अधिकाऱ्यानेच केंद्र सरकारवर लसीकरणाच्या कार्यक्रमावरून गंभीर आरोप केले आहेत. सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया या कंपनीचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी लशीबाबतच्या स्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा थेट आरोप केला आहे. केंद्र सरकारने लशीच्या साठ्याबाबत कोणतीही माहिती न घेता १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी दिली. इतकेच नाही तर, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) गाइडलाइन्सवर देखील केंद्र सरकारने विचार केला नाही, असे सुरेश जाधव यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आता राष्ट्रपती, पंतप्रधानांसाठी बेड्स राखीव ठेवण्याची गरज’, दिल्ली हायकोर्टाचे मत
- फडणवीसजी, लसी मिळवण्यात गुजरातचा स्ट्राइक रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त कसा ? – सचिन सावंत
- तुमचे अश्रू म्हणजे फक्त एक इव्हेंट; मोदीजी, ‘त्या’ जनतेचे अश्रू आठवा – चाकणकर
- ‘एकनाथ शिंदेंनी चांगलं काम केलं, पण उद्धव ठाकरे मात्र कपड्याची इस्त्रीही मोडू न देता मुंबईत परतले’
- संजय राऊत फार मोठे विद्वान, ते काहीही बोलू शकतात – चंद्रकांत पाटील


