Share

‘म्यूकरमायकोसिसचा खर्च महात्मा फुले योजनेत समाविष्ट करा’, खंडपीठाचे सरकारला आदेश

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांमध्ये म्यूकरमायकोसिसचा (काळी बुरशी) हा आजार जडत आहे. महागडी औषधे व दीर्घकालीन उपचारामुळे या आजारावरील उपचाराचा खर्च आठ ते दहा लाख रुपयांवर जात आहे. सरकारने हा खर्च महात्मा फुले जीवनदायी योजनेत समाविष्ट केला असला तरी त्याची मर्यादा दीड लाख रुपयेच आहे. मग या योजनेत पात्र ठरणारे उर्वरित मोठा खर्च कसा काय करतील? त्यामुळे राज्य शासनाने वाढीव खर्चाची उपाययोजना योजनेतून कशी करता येईल याबाबत तत्काळ माहिती सादर करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. बी. यू. देबडवार यांनी शुक्रवारी दिलेत.

पिवळे आणि केशरी कार्डधारकांसह दारिद्र्य रेषेखालील इतर नागरिकांना महात्मा फुले जीवनदायी योजनेत अशा उपचारासाठी केवळ दीड लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर या आजाराच्या रुग्णांना जास्तीचा उपचार खर्च लागतो. त्याचा अंतर्भाव कसा करता येईल यासंबंधी राज्याने विचार करावा व त्यांना आधार द्यावा, असेही खंडपीठाने नमूद केले. नगर जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग वाढत चालला आहे.

या स्थितीत आजारावरील गुणकारी इंजेक्शनचे वितरण व्यवस्थित होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. शिवाय काही भागांत प्रचंड तुटवडा जाणवत आहे. या तक्रारींमध्ये सरकारने तातडीने लक्ष घालावे, असे आदेशही हायकोर्टाने दिले.

दरम्यान, औरंगाबाद विभागात ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा न झाल्यास, तसेच ऑक्सिजन नसल्यामुळे रुग्णालयाने रुग्णास परत पाठविल्यास किंवा ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्यास शासनास जबाबदार धरण्यात येईल, अशी दुरुस्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. बी. यू. देबडवार यांनी शुक्रवारी पूर्वीच्या आदेशात केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!