🕒 1 min read
मुंबई : पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने गोवा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांना मोठा तडाखा दिला.महाराष्ट्रातील कोकणाला या तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी विविध प्रकारचे नुकसान झाले आहे. यापार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांसह सर्वपक्षीय नेते आता कोकणचा दौरा करू लागले आहेत.
दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्याकरिता कोकण दौऱ्यावर गेले होते. मोठा गाजावाजा करत केलेल्या या दौऱ्यात कोणत्याही ठोस मदतीची घोषणा देखील केली नाही.मुख्यमंत्र्यांचा तासातच हा दौरा अवघ्या काही तासातच संपला. केवळ दोन जिल्ह्यांचा धावता आढावा आढावा घेवून मुख्यमंत्री पुन्हा मुंबईत परतले. आता याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका होऊ लागली असून आता विरोधक सरकारला खिंडीत पकडू लागले आहेत.
मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे, चक्री वादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात. खरच BEST C M.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 22, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चार तासांच्या दौऱ्यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टोला लगावला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे.’मुख्यमंत्री साहेब, आम्हाला तुमचा अभिमान आहे. चक्रीवादळाला लाजवेल, असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी-देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे, तसे तुम्ही फिरलात. खरंच बेस्ट सीएम,’ असं म्हणत संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावरून उच्च न्यायालयाने फटकारलं; मुख्यमंत्री म्हणाले…
- भाषणबाजी नको, म्युकरमायकोसिस विरोधात काय होमवर्क केला ते सांगा ; कॉंग्रेसचा सवाल
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’
- भारतात कोरोनाचा हाहाकार ; ‘या’ राज्याने वाढवला ७ जूनपर्यंत लॉकडाऊन
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

