औरंगाबाद : जुने अन्सार कॉलनी पडेगाव येथील नागरीकांनी खासदार इम्तियाज जलील यांना १५ वर्षापासुन भेडसावत असलेल्या विद्युत पुरावठयासंबंधीची तक्रार केली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत खासदार इम्तियाज जलील यांनी महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ.नरेश गिते यांना सदरील परिसरात त्वरीत नविन विद्युत डिपी बसविण्याचे सुचित केले. त्याअनुषंगाने सहसंचालक यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना एका आठवड्याच्या आत नविन डिपी बसवुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
खासदार इम्तियाज जलील यांनी जुने अन्सार कॉलनी पडेगाव येथे भेट देवुन स्थानिक नागरीकांशी सविस्तर चर्चा करुन मुलभुत समस्या व तक्रारी जाणुन घेतल्या. चर्चेदरम्यान नागरीकांनी सदरील परिसरात प्रामुख्याने पंधरा वर्षापासुन विद्युत समस्या असल्याची तक्रार करुन विद्युत पुरवठा नसल्यामुळे त्यांना येणाऱ्या अडीअडचणी व समस्या खासदार इम्तियाज जलील यांच्या समोर मांडल्या. वेळेवर विद्युत पुरवठा व्हावा यासाठी महावितरण कार्यालयात पंधरा वर्षापासुन नविन विद्युत डिपीच्या मागणीचे निवेदन देवुन सतत पाठपुरावा करुन सुध्दा संबंधित विभागाकडून त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रतिसाद दिले जात नसल्याचे त्यांनी खासदार इम्तियाज जलील यांना सांगितले.
महावितरणचे सहसंचालक यांनी एका आठवड्यात तांत्रिक पाहणी करुन नविन विद्युत डिपी बसविण्यात येणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांना आश्वासित केले. खासदार इम्तियाज जलील यांनी तक्रारीची त्वरीत दखल घेत योग्य त्या सुचना केल्याने जुने अन्सार कॉलनी पडेगाव परिसरातील स्थानिक नागरीकांनी त्यांचे आभार मानुन पंधरा वर्षापासुन प्रलंबित असलेली मागणी पुर्ण होणार असल्याने आनंद व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
- दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावरून उच्च न्यायालयाने फटकारलं; मुख्यमंत्री म्हणाले…
- भाषणबाजी नको, म्युकरमायकोसिस विरोधात काय होमवर्क केला ते सांगा ; कॉंग्रेसचा सवाल
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’
- भारतात कोरोनाचा हाहाकार ; ‘या’ राज्याने वाढवला ७ जूनपर्यंत लॉकडाऊन
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

