Share

‘ओठो से छू लो तुम..’, शिखर धवनच्या बासरीचा आवाज एकदा ऐकाच ; पहा व्हिडीओ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जुलैमध्ये टीम इंडिया मुख्य खेळाडूंविना श्रीलंकेचा दौरा करेल. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यासारखे खेळाडू या दौऱ्यात सहभागी होणार नाहीत. कारण यावेळी ते इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची तयारी करणार आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या म्हणण्यानुसार टीम इंडिया श्रीलंकेत एकदिवसीय आणि टी -२० मालिका खेळणार आहे.

दौऱ्यापूर्वी खेळाडू आपल्या घरी वेळ घालवत आहेत. त्यासोबतच खेळाडू आपली आवड देखील जपताना दिसत आहेत. नुकताच सलामीवीर शिखर धावनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शिखर बासरी वाजवताना दिसत आहे. त्याने जगजीत सिंह यांची ‘ओठो से छू लो तुम….’ ही अजरामर गझल बासरीतून मंजुळ सुरावटींनी रसिकांना ऐकवली आहे. गब्बरच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चाहत्यांना गब्बरचा हा अंदाज फार आवडला आहे. त्याच्या या व्हिडीओवरती लाईक्स आणि कंमेंट्सचा पाऊस पडत आहे. शिखरचा बासरी वादनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड करतोय.

https://www.instagram.com/tv/CPIaU-PJlZm/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, श्रीलंका दौर्‍यावर कमीतकमी टी -२० आंतरराष्ट्रीय आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका असू शकतात. या टीमचे कोच राहुल द्रविड असणार आहे. तर या टीमचे नेतृत्व भारताचा सलामवीर शिखर धवन करणार आहे. तसेच या टीममध्ये हार्दिक पांड्या-कृणाल पांड्या व दीपक चहर–राहुल चहर या भावा भावांच्या जोडीचा टीम इंडियामध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!