Share

डॉक्टरच्या देखत बंगल्यातून चोरट्यांनी चंदनाचे झाड लांबवले, डॉक्टरने केली चोरट्यांची व्हिडीओ शुटींग

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : पुष्पनगरी परिसरात राहणाऱ्या डॉक्टरच्या बंगल्यात शिरलेल्या तीन चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून पोबारा केल्याची घटना शुक्रवारी (दि.२१) मध्यरात्री घडली. यावेळी डॉक्टरने चोरट्यांना हटकले तरी चोरट्यांनी डॉक्टरला न जुमानता चंदनाचे झाड कापून नेले.

चोरट्यांचा हा सर्व कारनाम्याची व्हिडीओ शुटींग डॉक्टरने आपल्या मोबाईलमध्ये केली आहे.
पुष्पगनगरी परिसरात डॉ.विवेक घारापुरे यांचा बंगला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास डॉ.घारापुरे यांच्या बंगल्याच्या आवारात तीन  चोरटे दाखल झाले. यावेळी झालेल्या आवाजामुळे डॉक्टर घारापुरे हे जागे झाले.

त्यांनी हातात बॅटरी घेवून बंगल्याची पाहणी केली असता तीन चोरटे चंदनाचे झाड कापत असल्याचे त्यांना दिसले. डॉ.घारापुरे यांनी चोरट्यांच्या दिशेने बॅटरीचा उजेड करून आरडा-ओरड केली तरी चोरट्यांनी निर्धास्तपणे चंदनाचे झाड कापून चोरून नेले. दरम्यान, डॉ.घारापुरे यांनी चोरट्यांचा हा सर्व कारनाम्याची व्हिडीओ शुटींग केली. सकाळी या घटनेची माहिती मिळाल्यावर गुन्हेशाखा पोलिसांसह क्रांतीचौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!