🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. याच संसर्गामुळे भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली. यानंतर जागतीक क्रिकेटमधील महत्वाची आशीया कप ही स्पर्धाही कोरोनाच्या संसर्गामुळे रद्द करण्यात आली आहे.
कोरोनामुळे स्थगित झालेले आयपीएलचे उर्वरित सामने इंग्लंडऐवजी यूएईत करण्यास बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमीन यांनी सुचवले आहे. अमीन हे आयपीएलचेदेखील सीईओ आहेत.
टी-२० विश्वचषकाचे आयोजन भारताऐवजी यूएईत झाले तरच आयपीएल सामने इंग्लंडमध्ये होऊ शकतील, असे त्यांचे मत आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आयपीएलचे उर्वरित सामने तसेच भारतात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या आयोजनासाठी एसजीएमचे आयोजन केले आहे. आयपीएलसाठी सप्टेंबर महिन्यात तीन आठवड्यांची विंडो मिळेल का, हा एकमेव अडथळा आयोजकांपुढे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावरून उच्च न्यायालयाने फटकारलं; मुख्यमंत्री म्हणाले…
- भाषणबाजी नको, म्युकरमायकोसिस विरोधात काय होमवर्क केला ते सांगा ; कॉंग्रेसचा सवाल
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’
- भारतात कोरोनाचा हाहाकार ; ‘या’ राज्याने वाढवला ७ जूनपर्यंत लॉकडाऊन
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’

