Share

इंग्लंडला जाण्याआधी वॉशिंग्टन सुंदरने मोहम्मद सिराजवर उपस्थित केले ‘प्रश्न’, म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर पुढच्या महिन्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर होणाऱ्या भारत-इंग्लंड मालिका होणार आहे. जून महिन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२१ चा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.

जून महिन्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर होणाऱ्या भारत-इंग्लंड मालिका होणार आहे. या दोन्ही मालिकेसाठी वॉशिंग्टन सुंदर आणि मुहम्मद सिराजची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघ दोन जूनला इंग्लंडला रवाना होणार आहे. या मालिकेपूर्वी सुंदरने मुहम्मद सिराजवर प्रश्न उपस्थित करत त्याची कमतरता सांगितली आहे.

सुंदरने सिराजच्या क्रिकेटबद्दल नाही, तर त्याच्या फॅशनबद्दल प्रश्न उपस्थित केले. एका मुलाखतीमध्ये सुंदरला मोहम्मद सिराजची कोणती गोष्ट बदलावीशी वाटते? असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा सिराजने फॅशन बदलली पाहिजे, असं उत्तर दिलं आहे. इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना सुंदर म्हणाला, ‘फॅशनच्या बाबतीत सिराज थोडा मागे आहे, त्याला यामध्ये थोडं काम करण्याची गरज आहे. फॅशनच्या खेळात सिराजला त्याचा दर्जा वाढवावा लागेल. जर तो ट्रेन्डच्या हिशोबाने गेला, तर चमत्कार करू शकतो.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!