Share

आयपीएल पाठोपाठ कोरोनामुळे जुन महिन्यातील ‘ही’ स्पर्धाही रद्द

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. याच संसर्गामुळे भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली. यानंतर जागतीक क्रिकेटमधील महत्वाची आशीया कप ही स्पर्धाही कोरोनाच्या संसर्गामुळे रद्द करण्यात आली आहे.

आगामी जुन महिन्यात श्रीलंकेत आशिया कप स्पर्धेचे आयोजन होणार होते. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय श्रीलंका क्रिकेट बोर्डाने घेतला. बुधवारी १९ मे रोजी यासंदर्भात घोषणा करण्यात आली. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एश्ले डिसिल्वा यांनी एक निवेदन जारी करत हा निर्णय सांगितला. यात ते म्हणाले की, ‘कोरोनाची सध्या परिस्थीती पाहता आशिया कप स्पर्धा आयोजीत करणे शक्य होणार नाही. या स्पर्धेचे आयोजन २०२३ विश्वचषका नंतर होऊ शकते.’ असे ते म्हणाले.

आशिया चषक हा २०२० मध्ये टी२० विश्वचषकापूर्वी भारतात आयोजीत करण्यात येणार होता. मात्र त्याकाळात कोरोनाच्या महामारीमुळे ही स्पर्धा जून २०२१ मध्ये खेळविण्याविषयी निर्णय झाला होता. तसेही या स्पर्धेत बीसीसीआयने या स्पर्धेसाठी दुय्यम संघ पाठवला असता कारण भारतीय संघ सध्य इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. आतापर्यंतच्या झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाने १९८४, १९८८, १९९०, १९९५, २०१०, २०१६ व २०१८ या हंगामात विजेतेपद पटकावेले आहे. शेवटची स्पर्धा ही २०१८ मध्ये खेळविण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!