🕒 1 min read
औरंगाबाद : एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत पंचवीसपेक्षा अधिक गोरगरीब शेत मजूरांच्या घरच्या दरवाजाचे कडी-कोंडे, कुलूप तोडून लाखोंचा ऐवज चोरून नेल्याची घटना सोमवारी (ता.१७) मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास थेरगाव (ता पैठण) येथे घडली असून चोरट्यांनी प्रत्येक ठिकाणी चोरी करतांना शेजारील घराचा बाहेरहून कडी-कोंडे लावून एक दुस-यास चाहूल लागू न देता रस्त्यालगत असलेल्या अवघ्या गावाच्या घराची झडती घेतल्याने ग्रामस्थात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
यासंबधी अधिक माहिती अशी, थेरगाव (ता.पैठण) ते पाचोड पैठण रस्त्यावर वसलेले तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. चोरट्यांनी गावांत मध्यभागी राहत असलेल्या गोरगरीब, शेतमजुरांच्या घरांना आपले लक्ष्य बनवत, चोरटयांनी चोरी करताना शेजारील घराच्या बाहेरहून कडया तर कुठे कुलूप लावुन एका – एका घराची झडती घेत चौफेर डल्ला मारला.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर अंगणात अस्ताव्यस्त पडलेले घरांतील कपडे, इतर साहित्य पाहुन हा प्रकार उघड झाला. त्यामुळे एकंदरीत या घटनेमुळे ग्रामस्थांत दहशतीचे वातावरण पसरले असून रात्री पोलिसांची गस्त सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सह.निरीक्षक गणेश सुरवसे, जमादार किशोर शिंदे, फेरोझ बरडे, विलास काकडे आदींनी भेट देऊन पाहणी केली.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबादेत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट मात्र मृत्युदर कायम
- अखेर ‘त्या’ वादावर पडदा ; जयंत पाटलांच्या प्रकल्पांना मंजूरी
- पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांतील कोरोनाचा आढावा घेणार
- पुलाखाली आढळला युवकाचा मृतदेह; बोरगावात एकच खळबळ
- बीसीसीआयच्या महिला आणि पुरुष संघातील भेदभावावर हरमनप्रितने टाकला पडदा, दिले ‘हे’ उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
