Share

दिलासादायक : करोना विषाणू 99.99 टक्के नष्ट करणारी थेरेपी विकसीत करण्यात वैज्ञानिकांना आले यश

Published On: 

🕒 1 min read

मेलबर्न – करोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात देखील थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊन लागू केले आहे.अतिशय घातक ठरलेल्या या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. जगभरातील देश लसीकरण करण्यावर भर देत आहेत तर शास्त्रज्ञ देखील दिवसरात्र मेहनत करून या विषाणूचा समूळ नायनाट कसा करता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत.

एका बाजूला हे चित्र असताना आता एक दिलासादायक वृत्त आलं असून करोनाचा विषाणू 99.99 टक्के संपविणारी थेरपी विकसीत करण्यात ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांना यश आलं आहे.ऑस्ट्रेलियाच्या मेंजीस हेल्थ इन्स्टिट्युट क्वीन्सलॅंडच्या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या टीमने ही थेरेपी विकसित केली आहे.

विकसीत केलेल्या थेरपीमध्ये, करोना विषाणूला आपला क्लोन बनविण्यापासून रोखले जाते. यामुळे करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी केले जाऊ शकते, असं संशोधन टीमच्या सदस्या नाईगेल मॅकमिलन यांनी सांगितलं. ही थेरेपी जीन सायलेन्सिंग तंत्रज्ञानावर आधारित आहे. जीन सायलेन्सिंग थेरेपीचा शोध 1990 च्या दशकात ऑस्ट्रेलियात लावण्यात आला होता.

श्वसनाशी संबंधित आजारांवर जीन सायलेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या थेरेपीमध्ये विषाणूंचा शोध घ्या आणि त्याला नष्ट करा, अशी कार्यपद्धती आहे. या थेरेपीच्या मदतीने व्यक्तीच्या श्वसन नलिकेत किंवा फुफ्फुसात असलेल्या विषाणूंना नष्ट करता येऊ शकतं.

या थेरेपीमध्ये नॅनो पार्टीकलला इंजेक्शनच्या माध्यमातून शरिरात सोडण्यात येते. हे नॅनोपार्टीकल फुफ्फुसात जावून आरएनए तयार करणाऱ्या पेशींमध्ये मिसळून जातात. त्यानंतर ते आरएनएमधील विषाणूंचा शोध घेऊन त्यांच्या जीनोमला संपवतात. त्यामुळे करोनाचा विषाणू दुसऱ्या विषाणूंना जन्म देऊ शकत नाही किंवा आपला क्लोन तयार करू शकत नाही.दरम्यान, ऑस्ट्रेलियातील संशोधक आणि शास्त्रज्ञानी अथक मेहनत घेवून सर्व परीक्षणे करून मगच हा दावा केला आहे त्यामुळे आशेचा नवा किरण दिसू लागला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!