जालना: कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट दिसत आहे. मात्र रुग्ण वाढत असून त्यातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तसेच कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या जरी कमी येत असली तरी कोरोनाचे हे महासंकट अजून संपलेले नाही, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे तसेच विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन येथील स्थानिक प्रशासन करत आहे. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सगळीकडे चांगलेच थैमान घातले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील मृतांचा आकडा वाढतच चालला असून सोमवारी सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याच सोबत ४०५ नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. मात्र या कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. जवळपास ८४१ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी प्रशासन आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा करत आहे.
जालना शहर ८६, चंदनझिरा ५, दरेगाव २, देवमूर्ती १, धानोरा १, हडपसावरगाव १, हतवन २, कारला १, कुंभेफळ १, नंदापूर १, सामनगाव १, सिंधी काळेगाव १, सिरसवाडी १, तांदुळवाडी १, तातेवाडी १, उखळी तांडा १, वडगाव वखारे १, वझर १, वखारी १, मंठा शहर ६, पाकणी १, कानफोडी २, केंधळी २, काथाळा १, माळतोंडी ४, मुरूमखेडा १, नालसी १, टाकलेपोखरी १, तळणी ४, उसवद २, परतूर शहर ८, दैठणा ४, हातडी १, कंडारी १, खांडवी १, खांडवीवाडी १, सालगाव १, श्रीष्टी ३, वैजोडा २, वरफलवाडी १, वाटूर १, वाटूर फाटा १, येणोरा २, घनसावंगी शहर ७ सह आरटीपीसीआरद्वारे ३९९, तर अँटिजनमधून ६ असे एकूण ४०५ अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय, खतांच्या दरवाढीचा निर्णय मागे घ्या’
- ‘..तेव्हा कोणत्या बिळात लोळत होतात?, पडळकरांचा काँग्रेसवर पलटवार
- ‘केंद्राने व्हेटिंलेटर दिले पण राज्य सरकारने ते गोदामात थप्पी मारून ठेवले’
- ‘खतांच्या किमती कमी न झाल्यास राज्य सरकार सबसिडी देणार’, मंत्री सुभाष देसाई यांची माहिती
- ‘केंद्राने दिलेले तकलादू व्हेंटिलेटर सुरू करून दाखवाच’, काँग्रेसचे फडणवीसांना थेट आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
