🕒 1 min read
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल सरकारमधील २ मंत्र्यांसह ४ नेत्यांना सीबीआयने अटक केल्याने राजकारण तापले आहे. ही कारवाई भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप करत टीएमसी कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते दुपारी सीबीआयच्या कार्यालयाबाहेर धडकले असून निदर्शने करण्याबरोबरच दगडफेक केली आहे.
#WATCH | TMC supporters hold protest outside the CBI office over the arrest of its leaders. pic.twitter.com/0lBPK92zfA
— ANI (@ANI) May 17, 2021
याच प्रकऱणामध्ये तृणमूल नेते आणि कोलकत्त्याचे माजी महापौर सोवन चटर्जी यांनाही अटक करण्यात आली आहे. राज्यपाल जगदीप धनकर यांच्या संमतीने ही अटक कऱण्यात आली. याबद्दल उशिरापर्यंक सीबीआयच्या कोलकत्त्याच्या कार्यालयाबाहेर तृणमूल कार्यकर्त्यांची निदर्शने सुरू होती. या कार्यकर्त्यांनी सीबीआयच्या कार्यालयावर दगडफेकही केली. यापूर्वीच राज्यपाल जगदीप धनकर यांनी ट्विट करत अशी परिस्थिती उद्भवू शकते, त्यामुळे ममता यांनी राज्यातल्या शांतता व सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे असं आवाहनही केलं होतं.
West Bengal: A large number of TMC supporters staged a protest outside the CBI office after four party leaders were arrested by the agency. pic.twitter.com/hFO9dDRCM8
— ANI (@ANI) May 17, 2021
सीबीआयने नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणी तृणमूलचे मंत्री फिरहाद हाकीम यांच्यासह सुब्रम मुखर्जी, मदन मित्रा आणि सोव्हान चॅटर्जी यांना चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात आणलं आहे. सोवन चॅटर्जी हे माजी महापौर आहेत. दरम्यान, नेत्यांना अटक केल्यानंतर काही वेळातच ममता बॅनर्जीसुद्धा सीबीआय कार्यालयात पोहोचल्या. सीबायच्या प्रवक्त्याने सांगितलं की, ‘४ तत्कालीन मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. १६ एप्रिल २०१७ च्या कोलकाता हायकोर्टाच्या आदेशानुसार एजेन्सीने गुन्हा दाखल केला आहे. आजच चारही नेत्यांना चार्जशीटसह कोर्टामध्ये आणलं जाईल.’
काय आहे नारदा प्रकरण?
नारदा स्टिंग ऑपरेशनमधील घोटाळा हा २०१६ च्या विधानसभा निवडणुकीवेळचा आहे. निवडणुकी आधी नारदा स्टिंग टेप प्रसारीत करण्यात आली होती. यामध्ये तृणमूलचे मंत्री, खासदार आणि आमदार हे खोट्या कंपनीच्या लोकांकडून पैसे घेत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. हे स्टिंग ऑपरेशन २०१४ मध्ये करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.
महत्वाच्या बातम्या
- ‘एवढा मोठा धिप्पाड गडी कोरोनाशी झुंज देताना हरला..’, कार्यकर्त्याच्या आठवणीत राजू शेट्टी भावूक
- ‘पनवतीयों का बाप है ये बॉस’, नितेश राणेंचे मुख्यमंत्री ठाकरेंबद्दल वादग्रस्त विधान
- दिलासा! आ.श्वेता महालेंनी सुरू केले आधार कोविड सेंटर
- तौत्के चक्रीवादळ; कामगार महिलेचा व्हिडिओ ‘तुफान’ व्हायरल, आनंद महिंद्रांनीही शेअर करत मनपाला दिला सल्ला
- लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याने भाजपचे तीन आमदार ताब्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
