Share

‘एवढा मोठा धिप्पाड गडी कोरोनाशी झुंज देताना हरला..’, कार्यकर्त्याच्या आठवणीत राजू शेट्टी भावूक

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : कोरोनामुळे अनेकांना आपले जवळेच लोक गमवावे लागलेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेदनादायी दु:खी भावनांना वाट करून दिली जातेय. ही व्यक्त होत आहेत. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनीही कोरोनामुळे आपला एक जिवलग मित्र गमावला आहे. कार्यकर्ता कमी आणि मिज्ञ असलेल्या बाळासाहेब चौगुले यांना त्यांनी सोशल मीडियातून भावपूर्ण श्रद्धांजलीची भावूक पोस्ट केली आहे.

‘माझ्या जिव्हाळ्याची माणसं एकापाठोपाठ एक घेण्याचा सपाटाच कोरोनाने लावलेला आहे. गेल्याच आठवड्यामध्ये देशाचे माजी कृषिमंत्री चौधरी अजित सिंग आणि कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. टी. हक यांच्या श्रद्धांजलीची पोस्ट मी लिहिली आणि बाळासाहेब चौगुले एका रांगड्या शेतकरी कार्यकर्त्यावर श्रद्धांजलीची पोस्ट लिहिण्याची वेळ माझ्यावर आली, असे म्हणत राजू शेट्टींनी दु:ख व्यक्त केलं आहे.

https://www.facebook.com/Rajushetti27/posts/313995070088578

शिरोळ (जि.कोल्हापूर) तालुक्यातील हेरवाड या गावचे बाळासाहेब चौगुले यांचे कोरोनाने निधन झाले. शेतकरी गडी रांगडा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल असंच ती त्यांची बुलेट, दररोज सकाळी साडे पाचला मला त्या बुलेटचं आणि बाळासाहेबांचे दर्शन घडायचं, मी फिरायला बाहेर पडलो कि नेमकं त्याच वेळी बाळासाहेब बुलेट वरून गुलाबाची फुले घेऊन मिरज मार्केटला जायला निघायचे. रस्त्यात मी भेटणार हे माहीत असल्यामुळे हमखास माझ्यासाठी चार-पाच गुलाब एकत्र करून एक गुच्छ तयार करून घेऊन यायचे आणि माझ्या हातात दिल्याशिवाय त्यांना चैन पडायचे नाही.

एखाद्या वेळेस मी बाहेरगावी गेलो असलो तरी न चुकता आमच्या घरी पोहोचत असे. असे हे बाळासाहेब संघटनेचे निष्ठावंत कार्यकर्ते संघटनेचं कोणतंही आंदोलन किंवा मोर्चा असो किंवा अजून काही उपक्रम असो पहिल्या फळीत असायचे. एवढा मोठा धिप्पाड गडी कोरोनाशी झुंज देता देता हरला आणि मी जिवाभावाचा साथीदार गमावला, अशा या सवंगड्याला भावपूर्ण श्रद्धांजली, अशी भावनिक पोस्ट राजू शेट्टी यांनी फेसबुक अकाऊंटवरुन लिहिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!