🕒 1 min read
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे त्यांच्या ट्विट्समुळे लोकप्रिय ठरत आहेत.आनंद महिंद्रा यांना ट्विटरवर आतापर्यंत ८४ लाख लोकांनी फॉलो केले आहे. विविध मुद्द्यांवर भाष्य करणारे त्यांचे ट्विट्समुळे माध्यमांत नेहमीच चर्चा होत असते.
तोत्के चक्रीवादळाने महाराष्ट्रात हजेरी लावत आता गुजरातच्या दिशेने प्रस्थान केलेय. कोकण किनारपट्टीला तौत्के चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. मुंबईत वादळाची ताशी ११४ किमी एवढी मोठी वेगाची नोंद झाली आहे. मात्र, तरीही एवढ्या मोठ्या वादळात, भर पावसात रस्त्यावरील साफसफाई करतानाचा एका महिला सफाई कर्मचाऱ्याचा व्हिडिओ वादळाप्रमाणे ‘तुफान’ व्हायरल झाला आहे.
त्या महिलेचा व्हिडिओ आनंद महिद्रांनी शेअर केला आहे. यावर त्यांनी प्रतिक्रियाही दिली आहे. ‘या महिलेचे काम प्रेरणादायी आहे. माझी मुंबई महापालिकेला एक विनंती आहे, की सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना रेनकोट दिलाच असेल, परंतू पुन्हा एकदा त्यांच्याकडे तो आहे की नाही हे एकदा सुनिश्चित करावे’. या छोट्याशा क्लिपमध्ये दिसत आहे की, महिला पावसात भिजत रस्त्यावर झाडू मारत आहे. केस सुके ठेवण्यासाठी महिलेने डोके प्लॅस्टिक पिशवीने गुंडाळले आहे. आजुबाजुने गाड्या जात आहेत आणि ती भिजतच तिचे काम करत आहे.
No question about it. No better motivation for today. And I know @mybmc provides them raincoats, but perhaps they can check again to ensure everyone has them… https://t.co/lpn13uKV3X
— anand mahindra (@anandmahindra) May 17, 2021
दरम्यान, सोशल मीडियावर एक्टिव्ह असण्यासोबतच मदत कार्यात देखील आनंद महिंद्रा पुढे आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्ली, मुंबई आणि पुण्यासह देशातील अनेक शहरात ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी Oxygen On Wheels अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत हॉस्पिटल आणि घरापर्यंत ऑक्सिजनची मोफत डिलिव्हरी केली जात आहे. कंपनी बोलेरो पिकअपच्या मदतीने दररोज ६०० पेक्षा अधिक सिलेंडर्सची डिलिव्हरी करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याने भाजपचे तीन आमदार ताब्यात
- सकारात्मक! २५ दिवसांनंतर कोरोनाचे नवे रुग्ण तीन लाखांपेक्षाही कमी
- कोरोना संसर्ग, मृत्यू टाळण्यासाठी प्लाझ्मा थेरपी लाभदायक नाही; आयसीएमआरचे मत
- धोनीच्या अंदाजात हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना तोडंघशी पडला फलंदाज
- करण जोहरच्या मुलांनी केली पावसाळ्याची तयारी; सोशल मिडियावर पोस्ट केला फोटो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
