मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही दिवसापासुन कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. या स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने बीसीसीआयने तत्काळ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
भारताचा माजी क्रिकेटपटु आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने नुकत्याच एका मुलाखतीत आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हीलीयर्सची स्तुती केली आहे. यावेळी तो म्हणाला की, ‘एबीला तुम्ही पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवा अथवा मंगळावर फलंदाजीला पाठवा तो तिथेही धडाकेबाज फलंदाजी करेल.’ असे म्हणाला. तसेच आकाश चोप्राने आरसीबीच्या या सत्रातील कामगीरीचे कौतुकही केले आहे. आयपीएल २०२१ मध्ये एबी डिविलियर्सच्या आधी ग्लेन मॅक्सवेलला फलंदाजीसाठी पाठवण्याचा निर्णय आरसीबीला फायद्यात ठरला.
स्पर्धा स्थगीत झाली असली तरी दरवर्षी प्रमाणे आरसीबीचा आघाडीचा फलंदाज एबी डिव्हीलीयर्सने नेहमीप्रमाणे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कोणातीही कसुर सोडली नाही. आरसीबीने यंदा एबीला नेहमीप्रमाणे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याऐवजी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठवले. मात्र पाचव्या क्रमांकावर खेळताना एबीने त्याची फलंदाजीची शैली न बदलता नेहमीप्रमाणे धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन केले. केकेआरविरुद्ध चेन्नई येथे झालेल्या सामन्यात डिविलियर्सने केवळ ३४ चेंडूत ७६ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
- चेन्नईचा प्रशिक्षक मायकल हसीची पुन्हा एकदा कोरोनावर मात, मायदेशी रवाना
- चक्रीवादळाचा तडाका; आतापर्यंत कोकणातील 6 हजार 500 पेक्षा जास्त नागरिकांचे स्थलांतर
- खतांच्या दरात वाढ : ‘आता शेतकऱ्यावर “दुष्काळात १३ वा महीना” म्हणण्याची वेळ आलीये’
- गोव्यातील भाजप सरकार राज्यपालांनी बरखास्त करावे ; काँग्रेसची मागणी
- #तोक्ते चक्रीवादळाचा कोल्हापूरलाही फटका; घरांसह शाळांचे छत उडाले, लाखोंच नुकसान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
