पुणे : गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोके वर काढले. आणि त्यातच पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅस, दाळी, खाद्यपदार्थांच्या किंमतींचे दरही आस्मानाला भिडले आहेत. यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला असून घर चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित होत आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसतांना आता खासगी रासायनिक खतांच्या किंमतीमध्येही सरासरी ४०० ते ५०० रूपये एवढी विक्रमी दरवाढ केली गेली आहे.
यामुळे या खतांच्या दरवाढीला आता विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला जबाबदार धरत टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी देखील केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘कोरोना मुळे लोक परेशान आहेत. रोजगार नाही पिकवलेल्या मालाला बाजारपेठ नाही आणि त्यात केंद्र सरकारने खताच्या भावामध्ये भरमसाठ वाढ केली आहे. केंद्र सरकारने केलेल्या खताच्या भाववाढीमुळे शेतकऱ्यावर “दुष्काळात १३ वा महीना”म्हणण्याची वेळ आली आहे.’ असं भाष्य मेहबूब शेख यांनी केलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी देखील केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. ‘पेट्रोलच्या किंमती झपाट्याने वाढल्याचा धक्का सर्व भारतीयांना लागलाच आहे मात्र आता खतांच्या किंमती प्रचंड वाढविण्याचे पाप केंद्र सरकारने केले आहे. कोरोनाने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या माथी हा दरवाढीचा बोजा टाकत केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या खतांच्या दरवाढीचा निषेध करते. आमचा शेतकरी बांधव याविरोधात आंदोलन करणार आहे त्या आंदोलनास देशभरातून प्रतिसाद मिळेल हा मला विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहील,’ असं भाष्य जयंत पाटील यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर ‘कोव्हॅक्सीन’ लस प्रभावी : भारत बायोटेक
- …म्हणून पुण्यात उद्या लसीकरण नाही ! महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती !
- कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी कधी लसीकरण करून घ्यावे ? घ्या जाणून !
- #तोक्ते चक्रीवादळाचा कोल्हापूरलाही फटका; घरांसह शाळांचे छत उडाले, लाखोंच नुकसान
- ‘महाराष्ट्राची प्रगती पचत नाही म्हणूनच फडणवीस असे उद्योग करतायत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

