Share

…पण मी कांगावाखोरांना उत्तर देत नाही; फडणवीसांच पटोलेंना प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

अकोला : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाची स्थिती गंभीर असून केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका मोदी सरकावर ठेवण्यात येत आहे. सोशल मीडियातूनही मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारवर टीका होत आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अलीकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेली पत्रं आणि विविध काँग्रेस नेत्यांची वक्तव्य डोळ्यापुढे ठेवत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल एक पत्र सोनिया गांधी यांना पाठविले असून, त्यांना महाराष्ट्रातील स्थितीची आणि त्याचा संपूर्ण देशातील कोरोना लढ्यावर होणारा परिणाम याची जाणीव करून दिली आहे.

यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर बोचरी टीका केली होती. कोरोनाला गांभीर्याने न घेतल्यानेच कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. सोनिया गांधी यांना पत्र लिहून देशाचे स्मशान बनविणा-या नरेंद्र मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत. त्यांनी मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस दाखवावे, असं आव्हान नाना पटोले यांनी दिलं.

आता याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मी मोदींना नेहमीच पत्रं लिहीत असतो. महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मोदींकडून मागत असतो आणि मोदींकडून ती मदत मिळतेही. महाराष्ट्राला सर्वाधिक व्हेंटिलेटर मोदींनी दिले. महाराष्ट्राला सर्वाधिक रेमडेसिवीर मोदींनी दिले. पण काहींना कांगावा करण्याची सवय आहे. अशा कांगावाखोरांना मी उत्तरे देत नाही,’ असं फडणवीस म्हणाले. ते अकोला दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी माध्यमांना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!