🕒 1 min read
वाराणसी : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेकांना आपल्या जवळील व्यक्तींना गमवावं लागलं आहे. तर, बड्या नेत्यांसह अनेक कलाकारांचा देखील कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या थैमानामुळे चिंताजनक वातावरणातही काही दिलासादायक व सकारात्मक असे वृत्त समोर येत आहेत.
कुठे नव्वदीपर केलेले वृद्ध व्यक्ती कोरोनावर मात करून घरी सुखरूप परतत आहेत, तर कुठे प्रकृती चिंताजनक असूनही प्रबळ इच्छेने कोरोना हरवत आहेत. अशीच एक सकारात्मक घटना आता समोर येत आहे. वाराणसीच्या डॉ. होमी भाभा कॅन्सर रुग्णालयात भरती असलेल्या 3 वर्षाच्या चिमुकल्याने कोरोनाला चितपट केलं आहे.
विशेष म्हणजे, रक्ताचा कर्करोग असतानाही या चिमुकल्याने कोरोनाला नमवलं आहे. रक्ताचा कर्करोग त्यात कोरोनाचा संसर्ग, अशा स्थितीत रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा चिमुकला मृत्यूच्या झुंजीत वाचेल का ? असा प्रश्न डॉक्टरांना पडला होता. मात्र, डॉक्टारांच्या व नर्सेसच्या अथक प्रयत्नांनी या ३ वर्षीय चिमुकला कोरोनामुक्त झाला आहे.
Nurses at HBCH couldn't get a better gift on Nurse's day. They are celebrating the recovery of a seriously ill Covid-19 positive child with cancer at HBCH, Varanasi . #COVID19#Cancer@akhileshPRO @pankajch37 @cspramesh @DAEIndia @AnupamPKher @PMOIndia @PMOIndia pic.twitter.com/SHLrfcxZIL
— Tata Memorial Centre, Varanasi (MPMMCC & HBCH) (@TMC_Varanasi) May 13, 2021
हा चिमुकला कोरोनामुक्त झाल्यानंतर पीपीई किट परिधान केलेल्या डॉक्टर्स व नर्सेसनी ‘जीत जायेगा इंडिया…’ या गाण्यावर ठेका धरत आनंद साजरा केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या लहानग्याने कोरोनाला हरवल्यानंतर इतर रुग्णांना देखील मानसिक आधार मिळाला असून ते देखील टाळ्या वाजवून प्रतिसाद देताना दिसत आहेत. आता या चिमुकल्याला दीर्घायुष्य व सुखी आयुष्य लाभो याच सदिच्छा ! सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रबळ इच्छा असल्यास आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो हे या चिमुकल्यानं आपल्याला शिकवलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पोलीस ममतांच्या कार्यकर्त्यांना भीत आहेत’, राज्यपालांचा गंभीर आरोप
- ‘जे ओबीसीला तेच मराठा समाजाला’ या तत्त्वावर फडणवीस सरकारने सवलती दिल्या !
- ‘कुठून हे नग मिळतात?’, माजी मुख्यमंत्र्यांवर जितेंद्र आव्हाड संतापले
- ‘राऊत साहेब, डोळे उघडा.. किती यादी सांगू?’, भाजपचे प्रत्युत्तर
- ‘..पेट्रोल भरायला गेलो तरी तिथेही फोटो असतो’, अजित पवारांचा मोदींना चिमटा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

