मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारला विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून अडचणीत आणले आहे.सध्या राज्यात फोन टॅपिंग प्रकरणाबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. दरम्यान आता कॉंग्रेसचे नेते व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे खासदार असताना नाना पटोलेंचे फोन टॅप झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अमजद खान यांच्या नावानं पटोले यांचा फोन टॅप करण्यात आला. याशिवाय त्यांच्या ४ सहकाऱ्यांचे फोन देखील टॅप करण्यात आले अशी माहिती समोर आली. यासंबंधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. फोन टॅपिंग होत असताना त्यावेळी राज्यात कोणाचं सरकार होतं, असा सवाल नाना यांनी उपस्थित केला आहे.
प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य असतं. कोणीही कोणाच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाही. सरकारच्या परवानगीशिवाय कोणाचेही फोन टॅप केले जाऊ शकत नाहीत. महाराष्ट्राचा गुजरात करण्याचा प्रयत्न केला जात असून माझा फोन टॅप केला गेला, त्यावेळी राज्यात कोणाचं सरकार होतं, असा प्रश्न यावेळी नाना पटोलेंनी विचारला आहे.
नाना पाटोळे यांनी केलेल्या या आरोपांवर आता भाजपचे नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ‘ २०१७ मध्ये नाना पटोले भाजपचे खासदार होते. त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यांची अवहेलना होता कामा नये. एका पक्षानं दुसऱ्या पक्षाच्या आणि स्वत:च्याही पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप करू नयेत. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमून चौकशी करण्यात यावी. मी नानांच्या सोबत आहे. अशा प्रकारे कोणाचेही फोन टॅप केले जाऊ नयेत,’ असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- परिस्थिती समजून घ्या, शेतकरी आंदोलनामुळे काही गावं कोरोनाची हॉस्पॉट झाली आहेत : खट्टर
- सलूनचालकाची आत्महत्या! अनेक दिवसांपासून होती आर्थिक विवंचना
- मंठ्यात नागरिक दुसऱ्या ‘डोस’च्या प्रतीक्षेत
- १८ वर्षांखालील मुलांमध्ये कोरोनाची काही लक्षणे आहेत का? आता शिक्षक करणार सर्वेक्षण
- सोशल मीडियावर ओळखीनंतर तरूणीवर अत्याचार! पीडितेची दोन लाख रूपयांची फसवणूक


