लातूर: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी आता ही संख्या काही प्रमणात नियंत्रणात येत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मात्र कोरोनाचे संकट अजूनही राज्यात तसेच जिल्ह्यात थैमान घालत आहेच, त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच येथील प्रशासनाने देखील आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री अमित देशमुख यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
कोरोना प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी आणि बाधित रूग्णांवर तत्पर, प्रभावी उपचाराच्या अनुषंगाने आवश्यक असणारे व्हेंन्टिलेटर्स, ऑक्सिजन, रेमडीसीवीर, इतर औषधे तसेच वैदयकीय उपकरणे यांची उपलब्धता व पुरवठा या बाबतीत मंत्रालयातून दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून लातूर जिल्हातील प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून येथील परिस्थितीचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. सदरील बैठकीत जिल्हाधिकारी बीपी पृथ्वीराज, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक निखील पिगळे व इतर अधिकारी उपस्थित होते.
लातूर जिल्हयात मागच्या काही दिवसात कोरोना बाधित रूग्णसंख्येत घट होत असली तरी नव्याने बाधीत होवुन येणाऱ्या रूग्णांना वेळेत चांगले उपचार मिळण्याच्या दृष्टीने तसेच संभाव्य तिसरी लाट आली तरी तिचा जिल्हयात कमीत कमी प्रभाव रहावा यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश या बैठकी दरम्यान देशमुखांनी दिले. शासकीय तसेच खाजगी रूग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारणीला गती देण्याचे, ऑक्सिजन तसेच व्हेंन्टिलेटर बेडची संख्या वाढवण्याचे, लहान मुलासाठी स्वतंत्र विशेष कक्षाची उभारणी करण्याचे, सर्व प्रकारच्या औषधांची उपलब्धता करून ठेवण्याचे व लातूर शहरात टेस्टिंग चे प्रमाण वाढवण्याचे निर्देश बैठकी दरम्यान दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- अमितकुमारांनी ही गोष्ट आधी सांगितली असती तर आम्ही सुधारणा केली असती – आदित्य नारायण
- सावधान! औरंगाबादेत आत्तापर्यंत ० ते ५ वयोगटातील १३२३ बालक कोरोनाबाधित
- ‘माझ्या देशातील लोक मरत असताना, मी आता लग्न करणार नाही’; ‘या’ अभिनेत्रीने घेतला निर्णय
- आशासेविका बनल्या आरोग्य व्यवस्थेचा कणा, मात्र तुटपुंज्या मानधनावर काम
- अभिनेत्री शुभांगी गोखले लेकीचे पत्र वाचून झाल्या भावुक; इन्स्टाग्रामवर शेअर केली पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

