औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढत आहेत या परिस्थितीत खेडोपाडी स्वत:चा जिव धोक्यात घालून अविरत सेवेच व्रत आशा सेविका बजावताना दिसत आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावर नागरिक आणि आरोग्य विभाग यांच्यातील दुव्याचे मोठे काम आशा सेविका हा कर्मचारी वर्ग करीत आहेत.
कोरोना काळात महत्त्वाचे काम करुण ही त्यांना मानधन मात्र तुटपुंजे असुन २४ तास सेवा बजावत आहेत तरी मानधन हे तोकडे असुन संसाराचा गाडा या मानधनावर चालत नाही त्यामुळे गावस्तरावर ग्रामपंचायत, यांनी कोरोना काळात आशासेविकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत करावी जेणेकरून कुटुंबाला आर्थिक हातभार लागेल. सुरवातीला आशा सेविकांची नियुक्ती करताना ती विवाहित असावी ही अट आहे. ग्रामिण भागातील नागरिकांसाठी आरोग्यविषयक सामाजिक कार्यकत्र्या अशी ओळख त्यांनी कोविड काळातही जपली आहे.
२०२० साली कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन घोषीत झाले त्या नंतर नेहमीच्या कामा पेक्षा जास्त काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे.या संसर्गाच्या पहिल्या लाटेत लक्षण आढळणा?्या रुग्णांच्या संपर्कात येण्याचे दिव्य त्यांना करावे लागले वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आरोग्य विभागाला शासनाने दिलेली जबाबदारी सार्थ करुण दाखवली.घरोघरी जाऊन बाधितांप्रमानेच त्यांच्या कुटुंबीयांचे स्वॅच घेणे.त्यांना गोळ्या वाटणे आणी हे सर्व करताना त्यांना आधार देण्याचे महत्त्वाचे काम देखील आशा सेविकांनी केले आहेत.कोरोना सर्वेक्षणासाठी थर्मल गन आणी ऑक्सिमीटर आशा वर्कर कडे सोपवुन घरोघरी कुटुंबातील प्रत्येक सदस्याची माहिती नोंदविण्याचे काम त्यांनी केले. मात्र तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहेत.कामाचा बाऊ न करता समाजसेवेचे हे व्रत अविरत चालू ठेवणाऱ्या आशा वर्कर यांचे काम पहाता मानधन खुपचं कमी आहेत.
तसेच प्रसुती,स्थनपान, विविध लसीकरण,गर्भप्रतिबनधक उपाययोजना, मासिक पाळी,नवजात बालकांची काळजी,आदी ६५ प्रकारचे कामे आशा सेविका कर्मचारी करतात तरी केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी दोन हजार रुपयांची मानधन आणी विविध सर्वेक्षण व लसीकरणातुन त्यांना भत्ते दिले जातात मात्र कामाचे स्वरूप पाहता मानधन तुटपुंजे आहेत.त्यामुळे गावातील नागरिकांसाठी आरोग्यविषयक काम करत असल्याने ग्रामपंचायत ने दखल घेऊन प्रत्येकी पाच हजाराची मदत आशा सेविकांना करावी. अशी मागणी होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुण्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र असले, तरी आपण आता गाफील राहणार नाही’
- ‘शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं आहे’
- ‘राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली’
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
- सोनू सूदने पंतप्रधान व्हावे, यावर उत्तर देत त्याने पुन्हा एकदा जिंकली लोकांची मनं…


