Share

सावधान! औरंगाबादेत आत्तापर्यंत ० ते ५ वयोगटातील १३२३ बालक कोरोनाबाधित

Published On: 

औरंगाबाद : कोरोना संसर्गाची तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक राहील अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तिसरी लाट रोखण्यासाठी महानगरपालिकेद्वारे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पहिल्या व दुसऱ्या लाटेत ० ते ५ वयोगटातील १३२३ बालकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात सोमवारी एकाच दिवसात ३१ बालके कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झाली आहेत त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

कोरोना संसर्गाची तिसरी लाट बालकांसाठी अधिक धोकादायक असेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात दोनशे बेड्स बालकांसाठी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत ० ते ५ वयोगटातील कोरोनाबाधितांची संख्या १३२३ एवढी झाली असल्याचे महापालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यात सोमवारी एका दिवसात नवे आठ रुग्ण दाखल झाले आहेत. तसेच ५ ते १८ वयोगटातील कोरोनाबाधितांची संख्या ७५३० इतकी झाली आहे. सोमवारी या वयोगटातील २३ कोरोनाबाधित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी मनपाने बालरोगतज्ञांसोबत दोन बैठका घेतल्या आहेत. एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे शंभर बेड्सचे कोविड केयर सेंटर केवळ बालकांसाठी तयार केले जात आहे. त्याशिवाय गरवारे कंपनीच्या माध्यमातून कंपनीच्या आवारातील शेडमध्ये देखील शंभर बेडचे कोविड केयर सेंटर तयार केले जात आहे. या दोन्हीही कोविड केयर सेंटरसाठी बाल रोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, अन्य डॉक्टर, इंटेन्सिव्ह अशा चार प्रमुख व्यक्तींची नियुक्ती केली जाणार आहे. औषधोपचार, क्रिटिकल केअर याचा देखील विचार केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!