Share

जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष पथक रस्त्यावर, दुकाने सील करण्याच्या कारवाईस वेग!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र हे निर्बंध लागू असतांना कोरोना नियमांचे उल्लंघन करत प्रशासनाच्या नजरेआड अनेक ठिकाणी दुकाने सुरु होती. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु आहे. शनिवारी १९ दुकाने सील करण्यात आली. आज (दि.१२) सकाळपासून विशेष पथकामार्फत कडक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कार्यवाही सुरू आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार उपायुक्त कार्यालय औरंगाबाद व महानगरपालिका औरंगाबाद यांच्या समन्वयाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. मंगळवारी (दि.१२) शहरातील गुलमंडी, सिटी चौक, औरंगपुरा, चेलीपुरा, कॅननोट, गजानन मंदिर, सेव्हन हिल, त्रिमूर्ती चौक या रहदारीच्या भागांमध्ये, बाजारांच्या ठिकाणी जोरदार कार्यवाही करण्यात आली.

अत्यावश्यक किराणा, इतर दुकानांना सकाळी ७ ते ११ पर्यंत उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र असे असतांनाही ११ नंतर काही ठिकाणी दुकाने सुरुच असल्याचे दिसून आली. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता भरमसाठ गर्दी जमवण्यात आली होती, अनेक परवानगी नसलेल्या आस्थापनाही सुरु असल्याने या सर्व दुकानांवर कारवाई करण्यात आली. औरंगाबाद शहरात फेब्रुवारी महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली. मात्र प्रशासनाने हाती घेतलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे महिनाभरात वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. मात्र अजूनही बाजारातील गर्दी कमी होतांना दिसत नाही.

पथकास विरोधाचे सत्र कायम

शहरातील रुग्णसंख्या कमी होत असल्याने अनेकजण निर्बंधांना गंभीरपणे घ्यायला तयार नाही. याच कारणामुळे दुकाने लपुन छपून सुरु ठेवणे, गर्दी जमवणे, इत्यादी प्रकार सुरु आहेत. या दुकांनाविरोधात कारवाई करतांना अनेक ठिकाणी पथकास विरोध झाल्याचे पाहायला मिळाले. सेव्हन हिल भागातील कोठारी साडीज या दुकानाचाही यात समावेश आहे. या पथकात कामगार आयुक्त यू.एस.पडीयल , सुविधाकर अधिकारी वी.एल.वैद्य , वाॅर्ड अधिकारी के.एल.ज्ञाते, कर निरिक्षक मनपा रमेश मोरे , कर निरिक्षक एस.वी.सरडकर, जवान मनपा किशोर जाधव यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!