Share

महामंडळाला फटका; लाखांचे उत्पन्न आले हजारावर

Published On: 

🕒 1 min read

जालना: राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यता आली असल्याने लोकं प्रवास करणं टाळत आहेत. तसेच कोरोनामुळे एसटी बस फेऱ्या देखील कमी करण्यात आल्या आहेत. याचाच सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसत आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून राज्य परिवहन महामंडळाचे एसटी बसेसचे शेड्यूल थांबले आहे. यामुळे जालना विभागाला दररोज २२ लाखांचा फटका बसत आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर दहा ते बारा बसेस मोजक्याच ठिकाणी सुरू होत्या. आहेत. मागील पाच-सहा दिवसांपासून प्रवासी संख्या रोडावल्याने याही बसेस बंद करून आता जालना आगारातून औरंगाबादसाठी एकच बस सोडली जात आहे.

टाळेबंदीमुळे बस वाहतुकीला प्रतिसाद मिळत नसल्याने यातून एसटीचे उत्पन्न घटले आहे. जालना विभागात २०० बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जाते. यातून दिवसभरात २२ लाख रुपये उत्पन्न मिळते. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच बसमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. सध्या जालना ते औरंगाबाद, अंबड ते जालना, परतूर, मंठा, जाफराबाद येथून दोन-तीन बसेस सोडण्यात येत होत्या. परंतु प्रवासी संख्या कमी होत असल्याने चारही आगारांतून एकही बस बाहेर पडत नाही.

राज्य परिवहन महामंडळाला कोरोना कालावधीपासून आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच प्रवास मिळत असल्याने प्रवासी संख्येत घट झाली आहे. त्यामुळे जालना आगारातून औरंगाबादसाठी केवळ एकच बस सोडली जात आहे. इतर अंबड, जाफराबाद आणि परतूर आगारातून एकही बस सोडली जात नाही. सर्व बसेस आगारात उभ्या आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर शासनाच्या आदेशानंतर प्रवासी बससेवा पूर्ववत केली जाईल, अशी माहिती जालना विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!