Share

बंगालमध्ये नुकतेच विजयी झालेले भाजपाचे २ आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत

Published On: 

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचे २ आमदार लवकरच राजीनामा देण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, भाजपाचे आमदार जगन्नाथ सरकार आणि दिनहाटा येथून आमदार निसिथ प्रमाणिक आमदारकी सोडण्याच्या तयारीत आहेत. हे दोघंही पश्चिम बंगाल विधानसभा अध्यक्ष बिमान बनर्जी यांच्याकडे येत्या २ आठवड्यात राजीनामा देऊ शकतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला वाटतंय की, या दोघांनी खासदार म्हणून काम सुरु ठेवावं. एका विधानसभेच्या छोट्याश्या मतदारसंघाऐवजी ७ मतदारसंघात लोकांची काम करून पक्ष वाढववणे जास्त फायद्याचे ठरणार आहे.

दरम्यान,भाजपचे हे दोन्ही नेते सध्या खासदार आहेत आणि आमदारपदावरही निवडले गेले आहेत. अशा परिस्थितीत खासदार आणि आमदार यापैकी एकच पद कायम ठेवू शकतात. शुक्रवारी या दोघांनीही आमदार म्हणून शपथ घेतली नव्हती. त्यानंतर त्यांचे आमदारपद सोडण्याची शक्यता वाढली आहे.

जगन्नाथ सरकार पश्चिम बंगालच्या राणाघाट लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत तर निसिथ प्रमाणिक हे २०१९ च्या निवडणुकीत कूच बिहार लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. दरम्यान, जर आमदारकी कायम ठेवली तर त्यांच्या रिक्त झालेल्या लोकसभा मतदारसंघात पुन्हा फेरनिवडणूक घ्यावी लागू शकते. त्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता लोकसभा निवडणुकीत २ जागा कायम राहतील का याबाबत भाजपाला चिंता वाटते आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!