नवी दिल्ली : अमेरिका, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया या चार देशांचा समावेश असलेल्या क्वाड आघाडीत बांगलादेश सहभागी होणार असल्याची नुसती चर्चाच सुरू झालेली असताना चीनचा तीळपापड झाला आहे. संतापलेल्या चीनने बांगलादेशला द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होण्याचा इशारा दिला आहे, तर बांगलादेशने यावर आपण सार्वभौम राष्ट्र असल्याची रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
डिप्लोमॅटिक करस्पॉडंट असोसिएशनने सोमवारी आयोजित केलेल्या डिजिटल बैठकीत बांगलादेशमधील चीनचे राजदूत ली जिमिंग सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, चार देशांचा छोटासा समूह असलेल्या क्वाडमध्ये बांगलादेशने सहभागी होणे नक्कीच चांगला विचार नाही. बांगलादेश जर क्वाड आघाडीत सहभागी झाला तर याचे द्विपक्षीय संबंधांवर विपरीत परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी दिला. क्वाड म्हणजे अमेरिकेच्या नेतृत्वाखालील चीनविरोधातील आघाडी असल्याचा आरोपही जिमिंग यांनी केला.
या वादग्रस्त वक्तव्यावर बांगलादेशकडून तत्काळ तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली. बांगलादेश हे कोणत्याही गटात सहभागी नसलेले एक सार्वभौम राष्ट्र आहे. आमचे परराष्ट्र धोरण आम्ही स्वत: ठरवतो. त्यामुळे क्वाडबाबत काय करायचे याचा निर्णय आम्ही घेऊ, अशा शब्दांत बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री डॉ. ए. के. अब्दुल मोमीन यांनी चीनला फटाकारले.
महत्त्वाच्या बातम्या :
- पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करा-काँग्रेस
- राज्याच्या अधिकारातील सवलती मराठा समाजाला द्या, काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- आरोपमुक्त करण्याची विनंती करणे आरोपीचा अधिकार-सर्वोच्च न्यायालय
- ‘टीका करण्याऐवजी सल्ले द्या’, राजनाथ सिंहांचा काँग्रेसला टोला
- ‘घरी कडी लावून बसलेल्यांना रिकामटेकडा म्हणतात’, भाजपचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

