Share

दु:खद! भारताचा माजी गोलंदाज रुद्रप्रताप सिंग याच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. याच कोरोनाच्या सावटाखाली भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा रद्द करावी लागली. मात्र ही स्पर्धा रद्द होण्यापुर्वी या स्पर्धेचा महत्वाचा भाग असलेल्या काही क्रिकेटपटूंनी स्पर्धा स्थगित करण्याआधीच स्पर्धेला अलवीदा म्हणले होते.

भारताचा माजी क्रिकेटपटु रुद्रप्रताप सिंगनेही कुटुंबासाठी आयपीएल स्पर्धेतुन माघार घेतली होती. मात्र बुधवारी १२ मे रोजी त्याच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याना काही दिवसापुर्वी कोरोनाची लागण झाली होती. या संकटाच्या काळात त्यांच्यासोबत राहण्यासाठी आयपीएल मध्ये हिंदी समालोचनाचा सदस्य असेलेल्या रुद्रप्रताप सिंगने स्पर्धा मध्येच सोडुन घरी गेला होता. मात्र आज बुधवारी १२ मे रोजी त्याच्या वडिलांची प्राणज्योत मालवली. रुद्रप्रताप सिंगने स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

या ट्विटमध्ये रुद्रप्रतापने लिहीले आहे की, ‘मोठ्या जड अंत:करणाने आणि दु:खाने सांगावे लागत आहे. की माझे वडिल शिव प्रसाद सिंह आज म्हणजे १२ मे रोजी कोरोनामुळे निधन झाले आहे. मी आपणाला विनंती करतो की त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तु्म्ही प्रार्थना करा. ओम नम: शिवाय’ असे लिहीले आहे. शिव प्रसाद सिंग यांच्यावर लखनऊमधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान श्वास घेण्यास त्रास होत होता यादरम्यान त्यांचे निधन झाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!