Share

राज्यात कोरोनामुक्तांच्या संख्येत मोठी वाढ, तर नवे कोरोना रुग्णही वाढले !

Published On: 

मुंबई : राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर, आता जवळपास निम्मा महाराष्ट्र हा पूर्ण लॉकडाउनच्या गर्तेत गेला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्तांमध्ये मोठी वाढ होत आहे. तर, नव्या रुग्णांमध्ये देखील मोठी घट होत असल्याचे आकडेवारीतून समोर आले होते. मात्र, आज कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली असून नव्या रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा ४० हजारांपार गेला आहे.

राज्यातआज ४० हजार ९५६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर तब्बल ७१ हजार ९६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच, गेल्या चोवीस तासात ७९३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात एकूण ५ लाख ५८ हजार ९९६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!