Share

विनामास्क विनाकारण फिरणाऱ्यांकडून ग्रामीण पोलिसांनी केला ‘एवढा’ दंड वसूल

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कडक संचारबंदी करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता त्याला स्थानिक प्रशासन आवश्यक ते सर्व उपाययोजना करत आहे. त्याच सोबत शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ मोहिमेची कडक अंमलबजावणी करण्यात येत असून विनामास्क विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड आकारण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या निर्देशानुसार १ एप्रिल ते ११ मे पर्यंत जिल्हात कोविड-१९ च्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कलम १८८ भादंवी प्रमाणे ३७७ गुन्हे दाखल करण्यात आले असुन विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांविरूध्द नगरपरिषद, ग्रामपंचाय यांच्या संयुक्त कारवाईत ४ हजार ४३६ नागरिकांकडून ४ लाख १२ हजार ७५० रुपये दंड वसूल करण्यात आला, तर नियमांचे उल्लंघन करून आस्थापना (दुकाने) उघडी ठेवणारे २३४ दुकानदारांच्या विरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण फिरणाऱ्या १० हजार ६४३ वाहनधारकांवर मोटर वाहन कायद्यान्वये २३ लाख ६७ हजार ३५० रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

तसेच ११ मे रोजी नियमांचे उल्लंघन करून दुकाने उघडी ठेवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करत गंगापुर पोलीस ठाणे अंतर्गत आंबेडकर चौक व राजीवगांधी चौकातील उघडी असलेली ६ दुकाने सिल करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे शिल्लेगाव पोलीस ठाणे येथील ७ दुकानांवर कारवाई करत २ हजार १०० रुपये दंड आकारण्यात आला तसेच वैजापुर येथील तीन दुकानांवर कारवाई करत ३ हजार रुपये दंड तसेच पाचोड, फुलंब्री, कन्नड, पैठण असे एकुण २३ दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. तर भादंवी १८८ प्रमाणे ८ गुन्हे दाखल करण्यात आले असुन संचारबंदी चे उल्लंघन करून विनाकारण फिरणाऱ्या २०९ वाहनधारंकावर ४६ हजार ६०० रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील नागरिकांनी सार्वजनिक स्तरावर एकत्रित जमा होऊन गर्दी करणे तसेच अत्यावश्यक वस्तु खरेदी करतांना एकमेंकाच्या अधिक संपर्कात येणे, अशा बाबी कटाक्षाने टाळून सर्वांनी त्रिसुत्री कार्यक्रम ज्यात मास्कचा वापर अनिवार्य, सॅनिटाईझर/साबनाने हात वारंवार स्वच्छ धुणे, फिजिकल डिस्टसिंग ठेवणे या बाबींचा सर्वांनी दैनंदिन जिवनात काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे. या नियमांचे जाणीवपुर्वक उल्लघंन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्था यांची गय केली जाणार नाही त्यांच्या विरूध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी पाटील यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!