Share

‘लष्कर ए तोयबा’च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा!

Published On: 

🕒 1 min read

श्रीनगर : जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग परिसरात मंगळवारी सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. एन्काउंटरमध्ये सुरक्षादलाने लष्करच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यापूर्वी कोकेरनागच्या वायलूमध्ये लष्कर-ए-तोयबाचे 3 दहशतवादी लपलेले असल्याची सूचना मिळाल्यावर सुरक्षादलाने सर्च ऑपरेशन सुरू केले होते. जम्मू-कश्मीर पोलिसच्या आयजीने सांगितले की, सुरक्षादलाने लष्करच्या दहशतवाद्यांना घेरले होते. दोन्ही बाजूंनी फायरिंग झाली. जवाबी कारवाईत तिघांनाही ठार करण्यात आले.

काश्मीरचे आयजी विजय कुमार म्हणाले की, तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आलं आहे. अनंतनागमधील कोकरनाग भागात दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार जवानांच्या एक संयुक्त पथकाने या परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. दरम्यान, जवानांची चाहूल लागताच लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडून जवानांवर बेछुट गोळीबार करण्यात आला. त्याला जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले.

ठार करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक असलेला उबेद शफी याचा १ एप्रिल रोजी अरिबाग येथे भाजपा नेत्याच्या घरावर लष्कर ए तोयबाकडून करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी होता. या हल्ल्यात जम्मू-काश्मीर पोलीस शिपाई रमीज राजा हे शहीद झाले होते. अशी माहिती काश्मीर पोलिसांकडून देण्यात आली आहे.

यापूर्वी ६ मे रोजी शोपियां जिल्ह्यात चकमक उडाली होती. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. तसेच एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले. सर्व दहशतवादी अल बदर दहशतवादी संघटनेचे होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!