🕒 1 min read
मुंबई : मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने पुढाकार घेऊन आरक्षण द्यावे अशी मागणी राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला अधिकार नसून केंद्र सरकार याबाबत निर्णय घेऊ शकतं असं म्हटलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व मंत्री अशोक चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जयंत पाटील आदी मंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन पत्र दिले आहे.
यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अशोक चव्हाण म्हणाले की, आरक्षण देण्याचा अधिकार राज्याचा नसून केंद्राचा आहे. राष्ट्रपतींचा आहे. आमच्या भावना राष्ट्रपती आणि केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. विधिमंडळात हा निर्णय एकमताने घेतलेला होता. त्याचा आदर करून या समाजाला न्यायहक्क मिळाला पाहिजे, अशी आमची भावना आहे. राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून आपण याबाबत मध्यस्थी करावी, अशी विनंती त्यांना केली अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाने #मराठाआरक्षण संदर्भात आज मा. @maha_governor यांची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता #SEBC आरक्षण देण्याचे अधिकार केंद्रीय पातळीवर आहेत. त्यामुळे राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून आपण याबाबत मध्यस्थी करावी, अशी विनंती त्यांना केली. pic.twitter.com/mFOh0uQhtj
— Ashok Chavan (@AshokChavan1958) May 11, 2021
दरम्यान, महाराष्ट्राच्या विधिमंडळाने मराठा आरक्षणाचा निर्णय एकमताने घेतला होता. त्याला विरोध झाला. पण आता जो निर्णय झाला तो जनतेचा आहे. समाजाला न्याय मिळाला पाहिजे. जसं आज राज्यपालांना पत्र दिलं, तसं पंतप्रधानांची भेट घेऊन पत्र देऊ. आज राष्ट्रपतींना पत्र दिलं. आता पंतप्रधानांनी रितसर वेळ मागून भेट घेऊ आणि त्यांनाही पत्र देऊ, असंही उद्धव ठाकरेंनी राज्यपालांच्या भेटीनंतर सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना मृत्यूचं पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच नाही का ? – आशिष शेलार
- नेहा आणि रोहनप्रीत मारामारी करत असल्याचा व्हीडिओ समोर; काय आहे नेमकं कारण ?
- व्हेंटिलेटरच्या मुद्द्यावरून खा.जलील आणि भाजप आ.सावेंमध्ये खडाजंगी
- दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली महिती
- राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार चक्रीवादळ;मच्छिमारांना सर्तकतेचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

