Share

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली महिती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रेटीपर्यंत अनेकजनाना या कोरोनाचा सामना करावा लागत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली आहे. ज्युनिअर एनटीआरने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे.

‘माझी कोविड -१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, कृपया काळजी करू नका, मी एकदम ठीक आहे. मी स्वतःला आणि माझ्या कुटुंबाला वेगळे ठेवले आहे. आम्ही डॉक्टरांच्या देखरेखीखाली सर्व कोरोनाचे नियम पाळत आहोत. मी गेल्या काही दिवसांत माझ्याशी संपर्क साधलेल्या लोकांना त्यांची कोविड चाचणी करवून घेण्याची विनंती करतो. सुरक्षित रहा’, असे त्याने ट्वीटमध्ये लिहिले आहे. त्याने सोशल मीडियावर ही माहिती दिल्यानंतर ज्युनिअर एनटीआरच्या चाहत्या वर्गाने तो बरा होण्यासाठी प्रार्थना केल्या आहेत.

ज्युनिअर एनटीआर हा एस.एस. राजामौलीच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘आरआरआर’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १३ ऑक्टोबरला तेलगूसह इतर भाषेत प्रदर्शित होणार आहे. ‘आरआरआर’ हा एक पीरियड ड्रामा सिनेमा आहे, हा चित्रपट दोन तेलुगू स्वातंत्र्यसेनानी अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात राम चरण अल्लुरी सीताराम राजूच्या भूमिकेत दिसणार असून ज्युनिअर एनटीआर कोमाराम भीमच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट मुख्य अभिनेत्री असणार आहे तर, अभिनेता अजय देवगणसुद्धा दिसणार असल्याने या चित्रपटाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!