Share

मनपाच्या ऑक्सिजन प्लांटची पळवापळवी!

Published On: 

औरंगाबाद : महापालिकेच्या मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने मंजूर केलेला ऑक्सिजन प्लांट आता घाटी रुग्णालयात उभारला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. लिक्वीड ऑक्सिजन प्लांट देखील तात्पुरता गुंडाळण्यात आल्याने आता मेल्ट्रॉनमध्ये केवळ पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मंजूर केलेले हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे दोन प्लांटच उभारले जाणार आहेत.

निधीची उपलब्धता, निविदा आणि वर्कऑर्डर यामुळे पालिकेने आठ महिन्यांपासून प्रस्तावित केलेला लिक्वीड ऑक्सीजन प्लांट अडकला होता. मात्र तो आता पूर्णपणे बारगळल्यात जमा आहे. त्याऐवजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या माध्यमातून हवेतून ऑक्सीजन निर्मितीचे दोन प्लांट तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून दोन प्लांट असे एकूण चार प्लांट उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने जाहीर केला होता.

मात्र आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये मंजूर केलेला ऑक्सिजन प्लांट रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा प्रशासनाने हे दोन प्लांट घाटी रुग्णालयात उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मेल्ट्रॉनमधील रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे.

याविषयी पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले की, ते दोन प्लांट घाटी रुग्णालयासाठी देण्याचा जिल्हा प्रशासनाने घेतलेला निर्णय आपल्याला माहिती नाही. मात्र तसे काही झाले असेल तर त्याबद्दल जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली जाईल. सध्या औरंगाबादमध्ये रुग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता नाही. रोज ५५ मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो, तेवढा ऑक्सिजन उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!