Share

‘अहो नड्डा, मोदींनी देशाला बनवलंय मृत्युंचा अड्डा’, सचिन सावंताचे शायरीतून टोले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यावर अनेक आरोप केले आहेत. देशात कोरोना महामारीच्या विरोधात लढत असताना काँग्रेस लोकांची दिशाभूल करत असून भीतीचे खोटे वातावरण तयार करत असल्याचा आरोप नड्डा यांनी आपल्या पत्रात केला आहे. इतकेच नाही तर संकटाच्या काळात राहुल गांधी आणि सर्व नेत्यांनी केलेली फसवणूक आणि ढोंगीपणामुळे त्यांना कायम लक्षात ठेवले जाईल, असा आरोपही केला आहे.

यानंतर आता काँग्रेसकडून भाजप अध्यक्ष नड्डा यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी तर ट्विटरच्या माध्यमातून शायरीतून नड्डा यांना टोला लगावला आहे. सावंत म्हणाले, सोनियांना पत्र लिहिण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी देशाला ज्या खड्ड्यात टाकले आहे ते अगोदर पाहा. विश्वगुरूंनी देशाला मोठे भिखारी बनवले आहे असे म्हणत उपरोधिक शायरी केली आहे.

”सोनिया गांधी जी को खत लिखने के पहले, नड्डा जी मोदी जीने देश को डाला जिसमें वो देखो, गड्ढा जी!, विश्व गुरु को विश्व भिखारी बना दिया वड्डा वड्डा जी, चुनावोंमें व्यस्त छवी चमकाने में मस्त प्रशासन सुस्त, मोदी जी ने देश बना दिया मौत का अड्डा जी।, देखो, देखो ना नड्डा जी।….’

काय म्हणाले होते नड्डा?
‘सध्याच्या काळात काँग्रेसचं वागणं दुखावणारं आहे, पण आश्चर्य वाटण्यासारखं नाही. तुमच्या पक्षातील काही सदस्य लोकांना मदत करत कौतुकास्पद कामगिरी बजावत असताना पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून नकारात्मकता पसरवत त्यांच्या कठोर मेहनतीला ग्रहण लावलं जात आहे’, अशी टीका जे पी नड्डा यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!