Share

म्युकोरमायकोसीसचा धोका वाढतोय, मनपाने तातडीने उपाययोजना कराव्यात- माजी उपमहापौर

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोनानंतर रुग्णांमध्ये रोग प्रतिकारक क्षमता कमी होताना दिसून येते. त्यातल्या त्यात मधुमेह, अशक्तपणा असलेल्यांमध्ये म्युकोरमायकोसीस या फंगल इन्फेक्शन आजाराचा सामना करावा लागत आहे. या आजारामुळे आजवर अनेकांना अंध्यत्व आले आहे. अशा रुग्णांवर वेळीच सर्जिकल व वैद्यकीय उपचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेने या आजाराचा संभाव्य धोका लक्षात घेता योग्य उपचारासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे केली आहे.

काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद पालिकेत आरोग्य विभागाची कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांवर अर्थातच पोस्ट कोविडच्या रुग्णांमधील लक्षणे व उपचारासंबंधी तज्ज्ञ डॉक्टरांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील खासगी रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती. या बैठकीतही कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांत मुख्यत्वे म्युकोरमायकोसीस हा आजार प्रकर्षाने आढळून येत असल्याबद्दल मंथन झाले होते. या पार्श्‍वभूमीवरच राजेंद्र जंजाळ यांनी म्युकोरमायकोसीस रुग्णांच्या उपचारासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी केली आहे.

त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनातील बाधितांत आता बरे झाल्यानंतर आता देशात म्युकोरमायकोसीसचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. भविष्यात हा आजारही कोरोना संसर्गाप्रमाणे फैलावण्याची भीती डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर उपचार करताना संसर्गजन्य रोगतज्ज्ञ, मक्सीलोफेशियल सर्जन्स, न्युरोसर्जन्स, तसेच कान-नाक-घसा तज्ज्ञांची गरज असून पालिकेच्या रुग्णालयांत अशा तज्ज्ञ डॉक्टर्स व सर्जन्स उपलब्ध करण्याचे नियोजन प्रशासनाने करावे, अशी मागणी जंजाळ यांनी केली आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मागणी अधिक व पुरवठा कमी असल्याने रेमडेसिवीरसह आवश्यक औषधीचा काळाबाजार वाढला आहे. त्यामुळे म्युकोरमायकोसीसससाठी आवश्यक असलेल्या लिपसोमल अ‍ॅम्फोटेरिसिन-बी या औषधाचाही काळाबाजार होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे औषध रुग्णांच्या वजनानुसार दिले जाते. 60 किलो वजनाच्या रुग्णाला दिवसाला सुमारे सहा इंजेक्शन लागतात. त्यामुळे म्युकोरमायकोसीससाठी लागणार्‍या सर्व औषधांचा पालिकेने तात्काळ साठा करून ठेवावा, अशीही सूचना जंजाळ यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!