औरंगाबाद : सध्या राज्यात ‘ब्रेक द चेन’ नियमावलीनुसार निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार औरंगाबाद शहरातही बाजारपेठा बंद आहेत. तसेच विनाकारण फिरण्यास बंदी आहे. मात्र, तरी देखील काही नागरिक रस्त्यांवर फिरत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी दिला होता. त्यानुसार कारवाई करण्यात येत असून अशा १९१ नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्या निर्देशानुसार औरंगाबाद शहरात ५४ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक नाकाबंदी पॉईंटवर पोलीस अंमलदार कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाई करत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची माेहिम देखील पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सुरू आहे.
अशा प्रकारे नियमांचे उल्लघन करणाऱ्या आणि अत्यावश्यक कारणाशिवाय फिरणाऱ्या १९१ इसमांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये भादंवी कलम १८८, २६९ आणि २७० प्रमाणे ४४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर वाहतूक विभागाच्या वतीने कारणाशिवाय फिरणाऱ्या एकुण १ हजार ७३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या माध्यमातून ४ लाख ३७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना मृत्यूचं पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच नाही का ? – आशिष शेलार
- नेहा आणि रोहनप्रीत मारामारी करत असल्याचा व्हीडिओ समोर; काय आहे नेमकं कारण ?
- व्हेंटिलेटरच्या मुद्द्यावरून खा.जलील आणि भाजप आ.सावेंमध्ये खडाजंगी
- दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली महिती
- राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार चक्रीवादळ;मच्छिमारांना सर्तकतेचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

