🕒 1 min read
नवी दिल्ली : काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. यामध्ये कोरोनाचा निपटारा करण्यासाठी त्यांनी काही उपाच सुचवले होते. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यसमितीने केंद्र सरकारच्या विरोधात ठराव पास केला. आता यावर भाजपच्या वतीने पलटवार करण्यात आलाय. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यावर अनेक आरोप केले आहेत.
देशा कोरोना महामारीच्या विरोधात लढत असताना काँग्रेस लोकांची दिशाभूल करत असून भीतीचे खोटे वातावरण तयार करत असल्याचा आरोप नड्डा यांनी आपल्या पत्रात केला आहे. इतकेच नाही तर संकटाच्या काळात राहुल गांधी आणि सर्व नेत्यांनी केलेली फसवणूक आणि ढोंगीपणामुळे त्यांना कायम लक्षात ठेवले जाईल, असा आरोपही केला आहे.
काँग्रेसचे काही सदस्य लोकांची मदत करत असून त्यांचे कौतूक करावे असेच काम करत आहेत. मात्र, पक्षाचे ज्येष्ठ नेते पसरवत असलेल्या नकारात्मकतेमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असल्याचा आरोपही नड्डा यांनी केला आहे. त्यांनी काँग्रेसच्या सर्व मुख्यमंत्र्यांवरही भीती पसरवण्याचा आरोप केलाय.
BJP National President Shri @JPNadda writes an open letter to Congress President Smt Sonia Gandhi on Congress' role during the pandemic and how the rest of the nation is fighting it together under the leadership of PM Modi. pic.twitter.com/Cr3zDYek68
— BJP (@BJP4India) May 11, 2021
भारताच्या अलिकडच्या इतिहासात लसीकरणासंदर्भात कोणतीच शंका नव्हती. मात्र, काँग्रेसने लसीरकणावर संशय व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या आकडेवारीवरुन कोणत्या राज्यात कोरोनाविरोधात व्यवस्थित काम झाले ते स्पष्ट होत असल्याचे नड्डा म्हणाले. पंजाब सारख्या राज्यांमध्ये मृत्यूदर सर्वाधिक का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या
- युवकाला टोळीने लुटले, पळून जाणाऱ्या टोळीला पोलिसांनी सिनेस्टाईलने पकडले
- नवाब मलिक जरा कमी बोलले तर अडचणी कमी होतील, दरेकरांचा टोला
- एबी डिव्हीलीयर्स नंतर ‘हा’ दिग्गज खेळाडूही टी-२० विश्वचषकात करु शकतो पुनरागमन
- ‘नद्यांमध्ये वाहणारे असंख्य मृतदेह, मोदीजी तो गुलाबी चष्मा आतातरी काढा’
- ‘या’ तालुक्यात सर्वात कमी लसीकरण; मृत्युदरही जास्त!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

