Share

पाय क्रिजमध्ये असुनही पाकिस्तानचा ‘हा’ खेळाडू झाला यष्टीचीत, अवघ्या तीन धावांनी हुकले शतक

Published On: 

🕒 1 min read

हरारे : झिम्बाब्वे विरुद्धच्या कसोटी मालीकेत पाकिस्तान क्रिकेट संघाने २-० असा दणदणीत विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व गाजवले. २ कसोटी सामन्याच्या या मालिकेतील दोन्ही सामने पाकिस्तानने एक डावाच्या फरकाने जिंकले.

झिम्बाब्वे विरुद्ध सामना जरी पाकिस्तान संघाने जिंकला तरी पाकिस्तानचा खेळाडू नौमान अलीचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. या सामन्यात नौमान अलीने ९व्या क्रमांकावर फलंदाजीला येत १०४ चेंडुत ९ चौकार आणि ५ षटकारासह ९७ धावांची खेळी केली. पाकिस्तानच्या डावातील १४८व्या षटकातील पहिला चेंडु गोलंदाज तेंदई चिसोरोने वाईट टाकला. यष्टिरक्षक चकाब्वाने चेंडु चपळाईने पकडत फलंदाजाला यष्टिचित केले. तिसऱ्या पंचानी टिव्ही रिप्लेमध्ये बघितले तेव्हा यष्टिचित केले त्यावेळी नौमन क्रिजच्या आतच होता मात्र त्याने पाय हवेत उचलला होता. त्यामुळे त्याला बाद देण्यात आले.

https://youtu.be/6u4LFVV9Pag

यष्टीरक्षकाच्या या चपळतेमुळे नौमनचे शतक केवळ ३ धावांमुळे हुकले. मात्र ९७ धावांच्या खेळीसोबतच नौमन हा पाकिस्तान संघासाठी ९ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी १९६७ मध्ये आसिफ इक्बालने ९व्या क्रमांकावर फलंदाजी करत १४६ धावांची खेळी केली होती. हा सामना पाकिस्तान संघाने १ डाव १४७ धावांनी आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!