🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने डोके पुन्हा वर काढले आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली होती. या स्पर्धेतील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती.
आयपीएल स्पर्धा स्थगीत झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू सुरेश रैनाच्या कुटुंबासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सुरेश रैनाची पत्नी प्रियंका रैनाच्या आईची आई म्हणजे आजीचे निधन झाले आहे. त्यांना काही दिवसापुर्वी कोरोनाची लागण झाली होती. दहा दिवसाच्या उपचारानंतर सोमवारी १० मे रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. सुरेश रैनाच्या पत्नीने सोशल मीडीयाच्या माध्यमातुन ही दु:खद घटना शेअर केली. प्रियंका रैनाने ट्विट करत लिहीले आहे की,’मी ९ वर्षाची असेल तेव्हा ती आमच्यकडे आली आणि तिनेच मला लहानाचे मोठे केले. तिला वाचवण्यासाठी शक्य ते प्रयत्न आम्ही केले मात्र १० दिवसांच्या लढ्यांनतर आखेर ती आम्हाला सोडुन गेली.’
We tried everything possible but my grandma (my Nani) lost her battle with COVID yesterday morning. Last 10 days she was under treatment in isolation & none of us could see her. I was just 9 yr old when she moved in with us & raised us all. I just can’t express how hollow I feel. pic.twitter.com/dNBZdQ0q8g
— Priyanka Chaudhary Raina (@PriyankaCRaina) May 11, 2021
या ट्विटमध्ये पुढे प्रियंकाने लिहीले आहे की,’मागील दहा दिवस आमच्यासाठी फारच कठीण होते. या काळात आम्ही खुप हताश होतो. तिचे आम्हाला आखेरचे दर्शनही मिळु शकले नाही. तीच्या नसण्याची कल्पनाही मला नरकयातना देत आहेत. आमच्या कुटुंबासाठी आणि खास करुन माझ्या आईवडीलासांठी ती सदैव पाठिंबा देत राहिली.’ असे लिहत प्रियंका रैनाने आजीसोबतचा एक फोटो ट्विट केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- टीव्ही अभिनेत्री मुनमून दत्ता यांना तात्काळ अटक करा : सचिन खरात
- मुंबईच्या रुग्णांची नोंद पुण्यात ? ठाकरे सरकारचं ‘मुंबई मॉडेल’ खोटं; राणेंचा घणाघात
- अनिल देशमुखांना आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरु असल्याचा राष्ट्रवादीचा दावा
- इंग्लंड दौऱ्यापूर्वी द्रविडचा कोहलीला मोलाचा सल्ला
- पैसे दिलेच नाही तर मग ED कशाला? अनिल देशमुखांवरील कारवाईवरून काँग्रेसचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

