🕒 1 min read
बदायूँ – देशात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दररोज होणारी कोरोना रुग्णांची वाढ खरतर धडकी भरविणारी आहे. नुकतीच कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,26,62,575 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,29,942 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 3,876 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,49,992 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
याच दरम्यान कोरोचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश सरकारने करोनावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाउन जाहीर केला असून अंत्यसंस्कारासाठी फक्त २० जणांना उपस्थित राहण्यासाठी परवानगी दिली आहे.मात्र तरीही एका मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
बदायूँ में जनाजे में भीड़ का वीडियो हुआ वायरल। कोरोना संक्रमण के बीच इस तरह की तस्वीर डराती है। देश-दुनिया के हालात देखने के बाद भी क्या डर नहीं लगता? pic.twitter.com/TneR651TX9
— SANJAY TRIPATHI (@sanjayjourno) May 10, 2021
मुस्लिम धर्मगुरु अब्दुल हमीद मोहम्मद सालिमुल कादरी यांचं रविवारी निधन झालं. दरम्यान लॉकडाउन असतानाही त्यांच्या अंत्ययात्रेसाठी हजारोंच्या संख्येने गर्दी झाली होती. बदायूँ येथील मशिदीत त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. यावेळी अत्यंदर्शनासाठी उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक लॉकडाउनचं उल्लंघन करत मशिदीत पोहोचले होते.
उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. “बदायूँमध्ये मुस्लीम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेदरम्यान करोनाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याने अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. १८८ तसंच संबंधित इतर कलमांच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे,” अशी माहिती बदायूँचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक संकल्प शर्मा यांनी बोलताना दिली आहे.
An FIR has been lodged against unidentified people for violating #COVID19 protocols during the funeral procession of a religious leader in Badaun. FIR was lodged under IPC 188 and other relevant sections of IPC: Sankalp Sharma, SSP pic.twitter.com/FRAF9b46W6
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 10, 2021
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांच्या अडचणी आणखी वाढल्या,आता ईडीनेही दाखल केला गुन्हा
- अनिल देशमुखांना आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरु असल्याचा राष्ट्रवादीचा दावा
- ‘भाजपची भाषा रामराज्याची होती परंतु आता उत्तरप्रदेश-बिहार रामभरोसे सोडले’
- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मोठी मागणी
- पैसे दिलेच नाही तर ED कशाला? अनिल देशमुखांवरील कारवाईवरून काँग्रेसचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

