🕒 1 min read
मुंबई – आपले तथाकथित पर्यावरण प्रेम दाखवत मुंबईकरांच्या हक्काच्या मेट्रोचे कारशेड आरे मधून इतरत्र हलविणाऱ्या ठाकरे सरकारने आता आरे मध्येच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करून आरेची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचे कारस्थान चालविले आहे, हे अत्यंत संतापजनक असून युवराज आदित्य ठाकरे व महाविकास आघाडी सरकारचे पर्यावरण प्रेम हे पूर्णतः बोगस व बेगडी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याची टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्व चे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
आरे मध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाची मनाई असताना सुद्धा ठाकरे सरकारने आरे मधील तब्बल 32310 वर्ग फुटाच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर केला. इतकेच नव्हे तर हा परिसर परि-संवेदनशील क्षेत्र असताना सुद्धा केवळ बिल्डरांच्या सोबत असलेल्या ‘आर्थिक’ संवादातून हा प्रकल्प करण्याचे ठाकरे सरकारने ठरविले आहे.
आरे कॉलनीत SRA योजना लागू करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे मेट्रोकारशेडला विरोध बोगस होता हे स्पष्ट झाले आहे. आदित्य ठाकरे यांचा ढोंगी चेहराही उघड झाला आहे.
मुंबईकरांचे भले करणारी मेट्रो कारशेड नको, मात्र बिल्डरांचे उखळ पांढरे करून टक्केवारची सोय करणारी SRAयोजना मात्र हवी. pic.twitter.com/NYtPsYSwa5— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 11, 2021
मुंबईकरांना फायद्याचा असणारा मेट्रो कारशेड प्रकल्प खोटी कारणे देत आरे येथून इतरत्र हलवून मुंबईकरांचे नुकसान केले, पण आता स्वतः सह बिल्डरांचे उखळ पांढरे करण्यासाठीच ठाकरे सरकारचे हे उद्योग सुरू आहेत. याविरोधात भारतीय जनता पार्टी मोठे जन आंदोलन उभारेल व गरज पडल्यास उच्च न्यायालयात सुद्धा जाणार असल्याचा इशारा सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांच्या अडचणी आणखी वाढल्या,आता ईडीनेही दाखल केला गुन्हा
- अनिल देशमुखांना आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरु असल्याचा राष्ट्रवादीचा दावा
- कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी जमली तुफान गर्दी
- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मोठी मागणी
- पैसे दिलेच नाही तर ED कशाला? अनिल देशमुखांवरील कारवाईवरून काँग्रेसचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

