🕒 1 min read
जालना: राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सोमवारी जालना शहरातील प्रमुख तीन सिमेंट रस्त्यांच्या कामासाठी ५ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत हा निधी मिळाला असून यातून प्रमुख रस्त्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होईल असे राज्य विधिमंडळ आश्वासन समितीचे प्रमुख आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.
या तीन प्रमुख रस्त्यांच्या कामासंदर्भातील निविदा प्रक्रिया जालना नगरपालिका प्रशासनाकडून तातडीने पूर्ण करण्यात येईल व उपरोक्त रस्त्यांची कामे लवकरच सुरू करून जालनेकरांची रस्त्यांची समस्या सोडवण्याची ग्वाही आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली. या संदर्भात अधिक माहिती देताना आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की, आपण राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रस्त्यांच्या कामासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
रस्त्यांच्या कामासाठी केलेली मागणी गांभीर्याने घेत नगरविकास विभागाने मागील कालावधीत जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गुरुबच्चन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिजामाता चौक आणि मस्तगड ते रेल्वेस्टेशन या प्रमुख तीन रस्त्यांच्या कामासाठी १० कोटी रुपयांचा निधी जालना नगरपालिकेला उपलब्ध करून दिला आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच कामांना सुरुवात होईल. सोमवारी मिळालेल्या ५ कोटी ५५ लाखांच्या निधीतूनही दर्जेदार कामे केली जाणार आहेत, असे आ. गोरंट्याल यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईच्या रुग्णांची नोंद पुण्यात ? ठाकरे सरकारचं ‘मुंबई मॉडेल’ खोटं; राणेंचा घणाघात
- अनिल देशमुखांना आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरु असल्याचा राष्ट्रवादीचा दावा
- इंग्लंड दौऱ्यापूर्वी द्रविडचा कोहलीला मोलाचा सल्ला
- पैसे दिलेच नाही तर मग ED कशाला? अनिल देशमुखांवरील कारवाईवरून काँग्रेसचा सवाल
- ‘म्यूकरमायकोसिस’चा जालन्यात शिरकाव; ११ रुग्णांना झाली लागण !


